लघुशंकेला गेला अन् 97 लाखांना मुकला!

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
लघुशंकेला गेला अन् 97 लाखांना मुकला!
लघुशंकेला गेला अन् 97 लाखांना मुकला!Saam Tv

पुणे - हडपसर Hadapsar परिसरात एक अजब - गजब घटना समोर आहे. येथील एका व्यावसायिकाला लघुशंकेला जावून येईपर्यंत तब्बल 97 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. मालक गाडीतून लघूशंकेसाठी उतरल्यानंतर गाडीत ठेवलेले तब्बल 97 लाख रुपये घेऊन चालक फरार झाला आहे. संबंधित घटना पुण्यातील Pune कल्याणीनगर Kalyani Nagar परिसरात घडली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे देखील पहा -

फरार आरोपी चालकाचे नाव विजय हुलगुंडे असे आहे. आरोपी हा कोंढवा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी गेल्या आठ महिन्यांपासून फिर्यादी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करत होता. आरोपीने फिर्यादीचा विश्वास देखील संपादन केला होता. पण सोमवारी इतकी मोठी रक्कम बघून चालकाने व्यावसायिकाला तब्बल 97 लाख रुपयांना गंडा घातला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com