nagpur tiger viral video  Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

nagpur tiger viral video : नागपुरात एका पेट्रोल पंपावर वाघाचं दर्शन झालं. पहाटेच्या वेळी वाघाची एन्ट्री झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Vishal Gangurde

नागपूरच्या कुही तालुक्यात पेट्रोल पंपाजवळ वाघाचे दर्शन

पंपावरील वाघाचा व्हिडिओ व्हायरल

पहाटे घटना घडल्याने दुर्घटना टळली

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील मांढळ येथील पेट्रोल पंपावर वाघ दिसला. रस्त्यावरच वाघ चालताना दिसला. या वाघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वाघामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

नागपूरच्या कुही तालुक्यातील मांढळ पचखेडी रस्त्यावर नायरा पेट्रोल पंपाजवळ अचानक वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांनी वाहने थांबवून वाघाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. तर काही जणांनी प्रत्यक्ष ठिकाणी उभे राहूनही व्हिडिओ बनवले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

एकाने तर दुचाकीवर असताना संयम सुचकता ठेवत दुचाकी वळवली. तर एका वाहनाच्या अगदी जवळून वाघ गेलाय. सुदैवानं सकाळी पहाटे घटना घडली, तेव्हा पेट्रोल पंपावर कोणीच नव्हते. गर्दीच्या वेळी वाघाची एन्ट्री झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. या वाघामुळे परिससरात घाबरगुंडी उडाली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नर वाघाची एन्ट्री

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत नव्या नर वाघाची एन्ट्री झाली आहे. शिलेदार असं या वाघाचे नामकरण करण्यात आले आहे. हा शिलेदार चांदोली राष्ट्रीय उद्यानातील तारा वाघिणीच्या हद्दीत आढळून आला आहे. त्यामुळे आता शिलेदाराचे तारासोबत नवे नाते जुळणार आहे. तारा आणि शिलेदाराची जोडी जमणार का, याकडे वन्यजीव अभ्यासकांचे देखील लक्ष लागले आहे.

याआधी शिलेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी वन विभागाच्या कॅमेऱ्यामध्ये आढळून आला होता. त्यानंतर 2025 मध्ये हा शिलेदार राधानगरीच्या अभयारण्यात आढळून आला होता. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतर उपक्रमांतर्गत चंदा, तारा आणि हिरकणी या वाघिणी आणण्यात आल्या आहेत. तर बाजी, सुभेदार आणि सेनापती हे नर वाघ आहेत. आता यामध्ये नव्याने शिलेदाराची एन्ट्री झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram युजर्ससाठी मोठी बातमी! आता तुमचे चॅट प्रायव्हेट राहणार नाहीत, मेटाचा धक्कादायक निर्णय

Petrol Diesel Rate: पुण्यात सीएनजीचे दर वाढले; तुमच्या शहरात पेट्रोल डिझेलच्या आजच्या किंमती काय?

Maharashtra News Live Update: सूवेंदू अधिकारी ११ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

Solapur : बोरामणी हत्याकांडातील मास्टरमाईंडने रचला होता देश सोडायचा प्लॅन; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या, 'त्या' एका चुकीनं घात झाला

SSC Result 2026: नशिबाची साथ! दहावीत हे ५ जण काठावर पास, सर्वच विषयात ३५ गुण; मार्कशीटची सर्वत्र चर्चा

SCROLL FOR NEXT