Nagpur Water Supply Cut News Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

Nagpur Water Supply Cut News : नागपूरमध्ये ७ ते ८ एप्रिल दरम्यान जलवाहिनीवरील कामामुळे पाणीपुरवठा ३६ तास बंद राहणार आहे. अनेक भागांमध्ये टंचाईची शक्यता असून नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • नागपूरमध्ये ७-८ एप्रिल दरम्यान पाणीपुरवठा बंद

  • ३६ तास जलशुद्धीकरण प्रकल्प बंद राहणार

  • अनेक झोनमधील भागांना पाणीटंचाईचा फटका

  • नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्यापासून पुढील दोन दिवस शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तांत्रिक कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या म्हणजे ७ एप्रिल ते ८ एप्रिल या दोन दिवसांमध्ये हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा जल साठा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील मुख्य जलवाहिनीवर वॉल्व्ह बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम ७ एप्रिल सकाळी १० वाजल्यापासून ते ८ एप्रिल रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत महापालिकेचे पेंच जलशुद्धीकरण प्रकल्प ३६ तास बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील नऊ झोनमधील अनेक वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

कोणत्या भागात असणार पाणीपुरवठा बंद

  • लक्ष्मीनगर झोनमध्ये गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला भागात पाणी बंद

  • टाकळी सिम, जयताळा, त्रिमूर्तीनगर भागात जलकुंभातून पुरवठा बंद

  • धरमपेठ झोनमध्येही परिणाम रामनगर, सिव्हिल लाईन, सेमिनरी हिल भागात पाणी बंद

  • फुटाळा लाईन, रायफल लाईन, टेकडी वाडी भागात पाणी बंद बर्डी आणि धंतोली परिसरातही टंचाई

  • हनुमाननगर झोनमध्ये चिंचभवन, ओंकारनगर, हुडकेश्वर परिसरातही पाणीपुरवठा बंद

  • श्रीनगर, नालंदानगर, दुमजली भागातही परिणाम, अनेक जलकुंभ क्षेत्रांमध्ये पाणी बंद

  • गांधीबाग झोनमध्ये पाणीपुरवठा खंडित सीताबर्डी, किल्ला महाल, मेडिकल परिसर प्रभावित

  • सतरंजीपुरा झोनमध्येही पाणी बंद बोरियापुरा, रेल्वे परिसर, वाहन ठिकाणा प्रभावित

  • आशीनगर झोनमध्ये नारा, नारी, जरीपटका भाग प्रभावित , नागरिकांनी पाण्याची साठवण करण्याचे आवाहन

  • मंगळवारी झोनमध्ये गिट्टीखदान, गोरेवाडा प्रभावित राजनगर आणि सदर परिसरातही पाणी बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: RCBlचं प्लेऑफमधील तिकीट कन्फर्म; पंजाबच्या पराभवानंतर २ संघांची 'चांदी', कसे असणार स्पर्धेचं समीकरण?

Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू

ATM मशिन गंडलं, नागरिकांची लॉटरी, 400 रुपयांची मागणी, मिळाले 2 हजार

PM Kisan Samman Nidhi: PM किसान योजनेत बाप-लेक दोघांनाही मिळू शकतात 2000 रुपये? जाणून घ्या नियम...

भाजप नगरसेवकांच्या घरावर बुलडोझर फिरणार? मनपाच्या नोटीसनंतर नेत्यांची धडधड वाढली

SCROLL FOR NEXT