चोरी  SaamTvNews
महाराष्ट्र

Nagpur : 40 तोळे सोन्यासह, ८० किलोची तिजोरीच चोरट्यांनी पळवली!

नागपूरमधील भाजपचे नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून चोरट्यांनी 40 तोळे सोन्यासह, चक्क 70 ते 80 किलो वजनाची तिजोरीच चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर मध्ये गिट्टीखदान पोलीस हद्दीततील हजारी पहाड येथे एक अनोखी चोरी समोर आली आहे. 70 ते 80 किलो वजनाची तिजोरी चोरांनी चक्क चोरून नेली आहे. या तिजोरीमध्ये जवळपास 40 तोळे सोने, तसेच हिरेजडित दागिने आणि मौल्यवान वस्तू होत्या. भाजपचे नगरसेवक आणि जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांच्याकडे चोरी झालेली आहे.

हे देखील पहा :

गवई यांच्या कुटुंबीयांचा कपड्याचा व्यवसाय आहे. 17 ऑक्टोबरला गवई कुटुंब मुंबईला खरेदीसाठी गेले होते. ते मुंबईला गेले असता घरी देखरेख करण्यासाठी त्यांचे नातेवाईक आणि एक नोकर होता. शनिवारी २३ तारखेला गवई कुटुंब परत आले. रविवारी त्यांनी लाकडी अलमारी उघडली पण त्यामध्ये तिजोरी मात्र दिसली नाही.

या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. आता याच्या मध्ये अद्याप तरी कुणाला अटक करण्यात आलेली नाही. पण पोलिस मात्र चौकशी करत आहे. या रहस्यमय टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना समोर देखील आव्हान आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, उमेश मानेवर बलात्काराचा गुन्हा; विवाहित महिलेशी जबरदस्ती संबंध ठेवले अन्...

Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Maharashtra News Live Update: बनावट शालार्थ आयडी प्रकरणात १,१०० पानांचे दुसरे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Junnar Fort : जुन्नरला जात असाल तर 'हा' किल्ला पाहायला विसरू नका, इतिहास अन् निसर्गाचा अनोखा संगम अनुभवाल

'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT