Nagpur ST Bus Accident Saam TV
महाराष्ट्र

Nagpur ST Bus Accident : नागपुरात अनियंत्रित एसटीची ४ दुचाकींना धडक, सुरक्षा भिंतही कोसळली

Nagpur News : बसचे ब्रेक फेल असल्याने हा अपघात झाला.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News :

राज्य परिवहन मंडळाच्या बसेसच्या दुरावस्थेबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. कधी छप्पर उडालेली, तर कधी गळकी एसटी बस रस्त्यावरुन धावताना तुम्ही पाहिली असेल. असाच एक धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे.

नागपूरच्या एसटी आगारातून निघत असलेल्या एसटीचा अचानक ब्रेल फेल होऊन अनियंत्रित झाल्याची घटना घडली आहे. या एसटीने आगारात पार्किंगमध्ये उभे असलेल्या चार दुचाकी वाहनांना चिरडत नेले. शेवटी सुरक्षा भिंतीवर एसटी आदळली. (Latest Marathi News)

या अपघातात आगाराची सुरक्षा भिंतही पडली. सुदैवाने या अपघातात चालक बचावला आहे. त्यामुळे अनफिट एसटी रस्त्यावर धावतात का? असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागपूरच्या वर्धमाननगर आगारातून चालकाने देवरी जाण्यासाठी बस काढत असताना हा विचित्र अपघात घडला. बसचे ब्रेक फेल असल्याने हा अपघात झाला.

नियमानुसार वाहन परीक्षकांनी बस आगारातून निघण्याच्या आधी फिट आहे की नाही हे तपासणे अनिवार्य असते. मात्र तसे होत नसल्याने हे अपघात होत आहेत. सुदैवाने ही बस आगाराच्या बाहेर न निघाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-बायको आणि आईसह वहिनीचाही मृत्यू, नेमके काय घडले?

Jana Nayagan Leak: थलापती विजयला आणखी एक मोठा झटका; प्रदर्शनापूर्वीच 'जन नायकन' ऑनलाईन लीक

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात येण्यापूर्वी भाजपचे अनोखे आंदोलन

गर्लफ्रेंडनं नकार दिला, बॉयफ्रेंडच्या डोक्यात हैवान शिरला; HIV चे इंजेक्शन टोचले, मनानं खचलेल्या मुलीनं आयुष्यच संपवलं

Nanded Crime: शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकरच्या खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रेयसीच्या आईनेच दिली हत्येची सुपारी

SCROLL FOR NEXT