Nagpur Spa And Saloon Saam TV news
महाराष्ट्र

स्पा अन् सलूनच्या नावाखाली देहविक्री; गरीब तरूणींना टार्गेट, पोलिसांनी धाड टाकत ग्राहकांसह रंगेहाथ पकडलं

Nagpur Spa And Saloon: नागपूरच्या मंगलमूर्ती चौकातील स्पा–सलूनवर पोलिसांची धाड. देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका. व्यवस्थापक अटक; दोन मालक फरार, पोलिसांचा शोध सुरू.

Bhagyashree Kamble

  • नागपूरच्या मंगलमूर्ती चौकातील स्पा–सलूनवर पोलिसांची धाड.

  • देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका.

  • व्यवस्थापक अटक; दोन मालक फरार, पोलिसांचा शोध सुरू.

  • गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीच्या जाळ्यात ओढले जात होते.

नागपूरमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच नागपूरच्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील नामांकित 'स्पा' आणि सलूनच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी धाड टाकत देहविक्रीचा व्यवसाय बंद पाडला. तसेच पीडित तरूणींची सुटका केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या त्रिमूर्तीजवळील मंगलमूर्ती चौकात स्पा आणि सलून आहे. या सलूनमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. याची माहिती नागपूर पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकण्याचा प्लॅन रचला. तसेच रचलेल्या प्लॅनप्रमाणे त्यांनी धाड टाकली. तसेच आरोपींना रंगेहाथ पकडलं. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने राणाप्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.

या धाडीत पोलिसांनी व्यवस्थापक रंजीत हलदार याला अटक करण्यात आली. मालक गौरांग विश्वास आणि जगदीश पाटील यांच्यासोबत देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या धाडीदरम्यान, पोलिसांनी दोन पीडिताची सुटका केली आहे. तर, पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

सध्या पोलिसांकडून दोन जणांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरीब तरुणी आणि महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यावसायात ओढले जात होते. पोलिसांनी आरोपींना अटक करून स्पा आणि सलूनची तपासणी केली. पोलिसांनी तेथून डीव्हीआर आणि मोबाइल जप्त केला आहे. आरोपींविरोधात राणाप्रतापनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर आरोपी आणि पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT