Nagpur Saam
महाराष्ट्र

Shocking Crime: दारू पिऊन शिवीगाळ, हटकलं म्हणून डोक्यात राग; चाकू काढला अन् सपासप वार; विदर्भात खळबळ

Shocker Youth Killed Over a Minor Argument: दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्याला आला राग. हटकले म्हणून आरोपीने घरातून आणला चाकू. सपासप वार करत अंकुशला संपवलं.

Bhagyashree Kamble

क्षुल्लक कारणावरून एकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी आरोपी दारू पिऊन अंकुशला शिवीगाळ करत होता. शिवीगाळ का करतो? म्हणून त्याने हटकले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. आरोपीनं चाकूने वार करत अंकुशला संपवलं. ही धक्कादायक घटना नागपूरच्या धंतोली पोलीस ठाणे हद्दीत घ़डली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशन हद्दीत क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या झाली आहे. अंकुश देवगिरकर अस मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, आयुष मंडपे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री आयुष मंडपे दारू पिऊन शिवीगाळ करत होता. यावेळी अंकुशने त्याला शिवीगाळ का करतो म्हणून हटकलं.

हटकले म्हणून दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर आरोपीने घरी जाऊन चाकू आणला. आयुषने चाकू पियुष नामक आरोपीकडे दिला. पियुषने अंकुशवर सपासप वार केले. यात अंकुशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT