Nagpur’s Nandanvan Colony where a youth was killed  saam tv
महाराष्ट्र

नागपूर हादरलं! मुलीच्या डोक्याला दुखापत, मुलाच्या छातीवर धारदार शस्त्रानं वार; नंदनवन कॉलनीतील 'त्या' खोलीत जोडप्यासोबत काय घडलं?

Nagpur Crime: नागपूरच्या नंदनवन कॉलनीत एक धक्कादायक घटना घडलीय. येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाची भाड्याच्या खोलीत हत्या करण्यात आलीय. पोलिसांनी या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • नागपूरच्या नंदनवन कॉलनीत तरुणाची हत्या

  • जखमी मुलगी ही त्याची नातेवाईक असून भेटायला आली होती.

  • मृत बालाजी कल्याणी हा पोलीस भरतीसाठी तयारी करत होता.

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूर शहरात धक्कादायक घटना घडलीय. शहारतील नंदनवन परिसरात एका मुलावर आणि मुलीवर जीवघेणा हल्ला झालाय. यात तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचे नाव बालाजी कल्याणी आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालीय. मृत बालाजी हा पोलीस भरतीची तयारी करत होता. नागपुरातील नंदनवन परिसरात मित्रासोबत भाड्याच्या खोलीत तो राहत होता. जोडप्यावर हल्ला झाला त्यावेळी ते दोघेही खोलीत होते. त्यांच्यावर कोणी हल्ला केला? याचा तपास नंदनवन पोलीस करत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेली मुलगी ही मृत बालाजीची नातेवाईक आहे. ती त्याला भेटायला आली होती. बालाजी कल्याणीला पोलीस व्हायचं होतं. त्यासाठी तो तयारी करत होता. तो आपल्या मित्रासोबत राहत होता. घटनेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी रात्री एक मुलगी त्याला भेटायला आली होती. ही मुलगी त्याची नातेवाईक होती. भेटायला आली होती तेव्हा बालाजीचा मित्र शेजारच्या खोलीत झोपायला गेला होता.

बुधवारच्या मध्यरात्री स्थानिकांना मुलगी जखमी अवस्थेत दिसली. तेथील लोकांनी खोलीची तपासणी केला तेव्हा मुलाच्या मुलाच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याचं दिसलं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या डोक्याला दुखापत झाली , त्यांनी दोघांना एका रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी मुलाल मृत घोषित केलं. तर मुलीवर उपचार सुरू आहेत.

मुलाची हत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी मुलीचा जबाब घेतलाय. त्याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. मुलगी वारंवार आपला जबाब बदलत आहे. त्यामुळे मुलीनेच बालाजीचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र मुलगी वारंवार आपल्या जबाब बदलत आहे. आम्हाला याप्रकरणी रात्री कॉल आला होता. मिळालेल्या माहितीनुसार आम्ही नंदनवन कॉलनीत गेलो. तेथील नागरिकांनी आधीच दोघांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तेथे मुलीचा जबाब घेतला. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचा मृत्यू रुग्णालयात पोहोचण्याआधीच झाला होता, अशी माहिती नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जीवाशी खेळ! पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना; पोलिसांकडून कारवाईत १ कोटींचा मुद्देमाल जप्त

Akola News: अकोल्यात विद्यार्थ्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे? व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Maharashtra Live News Update : दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये २५० हून अधिक प्रवासी अडक

Navale Bridge: एक चूक पडेल महागात! नवले पुलावरील अपघातांनंतर मोठा निर्णय, पुणे पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर

पनवेलजवळ अपघात, रेल्वे ट्रॅकवरून मालगाडी घसरली, VIDEO

SCROLL FOR NEXT