Police and officials at the residence in Nagpur where a deputy tehsildar was found dead. साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

विदर्भ हादरला! नायब तहसीलदाराची आत्महत्या, राहत्या फ्लॅटमध्ये घेतला गळफास

Nagpur latest news today : नागपूरच्या हिंगणा परिसरात नायब तहसीलदार वैभव राठोड यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Nagpur deputy tehsildar suicide case : नागपूरमधील हिंगणा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मौदा येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या एका ४२ वर्षीय अधिकाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. वैभव रामेश्वर राठोड असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. बायको अन् मुले बाहेर गेल्यानंतर राठोड यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण ते मागील काही दिवसांपासून तणावात असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव राठोड हे वानाडोंगरी येथील ग्रीन फिल्ड सोसायटीत राहायला होते. रविवारी त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेले. त्यानंतर ते घरात एकटेच होते, त्यावेळी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. संध्याकाळी त्यांच्या बहिणींने घराचे दार वाजवत त्यांच्यासोबत संपर्क साधला, पण कोणताही प्रतिसाद आला नाही. दरवाजा आतून बंद असल्याने संशय बळावला. तातडीने एमआयडीसी पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरवाजा तोडल्यानंतर समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमीन सरकली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत प्रवेश केला, पण बेडरूममध्ये वैभव राठोड यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. घटनास्थळावर सुसाइड नोट अथवा अन्य काही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

तहसीलदार राठोड हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, या तणावाचे नेमके कारण काय? कामाचा व्याप की अन्य काही वैयक्तिक कारण? याचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. अद्याप कोणतीही सुसाईड नोट हाती लागलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. राठोड यांनी आयुष्याचा दोर कापल्याने कुटुंबावर आणि कार्यालयात शोककळा पसरली आहे.

टीप - नैराश्यातून किंवा तणावातून आत्महत्येचा विचार मनात येणे हे अत्यंत कठीण असू शकते. पण 'आत्महत्या' हा कोणत्याही संकटावरचा कायमस्वरूपी उपाय नाही.तसे विचार आल्यास हेल्पलाईन नंबर क्रमांकवर नक्कीच संपर्क करा.. अथवा आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर, मित्रांसोबत बोलून मन मोकळं करा.. आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

वृद्धाश्रमाला भीषण आग; ४० ज्येष्ठ नागरिकांची सुखरूप सुटका|VIDEO

SCROLL FOR NEXT