Sharad Pawar | शरद पवार  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : शरद पवारांच्या सुरक्षेत होणार वाढ

शरद पवार उद्या विदर्भाच्या दौऱ्यावर

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानाबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (८ एप्रिल) आंदोलन केले. या आंदोलनाने हिंसक वळण धारण केले. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Worker) पवार यांच्या घरावर दगडफेक केली तसेच चपलाही फेकल्या. या घटनेमुळे राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून कालच्या घटनेमुळे राज्यातील राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. (Nagpur: Security will be beefed up for Sharad Pawar)

हे देखील पहा :

पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर काल एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड.गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यासह १०७ आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी विविध कलमांखाली अटक केली आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे उद्या विदर्भाच्या दौऱयावर आहेत. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

उद्या रविवारी सकाळी १० वाजता शरद पवार यांचं नागपूर विमान (Nagpur) तळावर आगमन होणार आहे. नागपूर विमानतळावरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांचा सत्कार करणार आहेत. शरद पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळेच उद्या नागपूर विमानतळावर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

SCROLL FOR NEXT