Nagpur Accident  Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Accident : पिकनिकला निघालेली शाळेची बस उलटली; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपुरातील दुर्दैवी घटना

Nagpur bus Accident : नागपुरात शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

Nagpur Accident : नागपुरातून अपघाताची घटना उघडकीस आली आहे. नागपुरात विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचा अपघात झाल्याची घटना घडली. देवळी पेंढरी घाटात हा अपघातात झाल्याची घटना घडली. या घटनेत एका विद्यार्थिीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये एकच खळबळ उडाली.

नागपुरात सहलीसाठी निघालेल्या बसला देवळी पेंढरी घाटात अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. निर्वाणी शिवानंद बागडे असे मृतक मुलीचं नाव आहे. ती दहाव्या वर्गात शिकत असल्याची माहिती हाती आली आहे. या अपघातात दोन विद्यार्थिनींना अधिक दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. त्याचबरोबर सात ते आठ विद्यार्थ्यांना अधिकची दुखापत झाल्याने त्यांच्यावर नागपूर एम्ससह वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरूपाचा जखम असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

नागपुरा सरस्वती विद्या मंदिर येथील बस ४७ विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी येथे पिकनिक असल्याने शिक्षकांसह बसने निघाले होते. यादरम्यान घाटात बस उलटली. त्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. याशिवाय तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. इतर विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. अचानक झालेल्या अपघाताने पालकांमध्ये खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ताफ्यासह दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी एम्समध्ये दाखल केले. यावेळी एक विद्यार्थिनीला डॉक्टरने मृत घोषित केले. या ठिकाणी पोलीस उपायुक्त रोहित मतांनी यांच्यासह जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनीही एम्स रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांसंदर्भात माहिती जाणून घेतली.

देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

नागपुरातील अपघाताच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'सरस्वती हायस्कूलच्या सहलीतील वाहनाचा एक दुर्दैवी अपघात झालाय. त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुःखद आहे. त्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांना सर्वतोपरी मदत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. स्वतः जिल्हाधिकारी यांनी एम्समध्ये भेट देऊन पालकांशी संवाद साधला आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT