Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, आज पदभार स्वीकारणार

Rashmi Shukla IPS : निवडणुकीच्या काळात सक्तीच्या रजेवर असणाऱ्या रश्मी शुक्ला यांच्याकडे पुन्हा पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Rashmi Shukla news
Rashmi Shukla Saam TV
Published On

Rashmi Shukla News : रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आळी आहे. संजय कुमार वर्मा यांच्याकडून रश्मी शुक्ला पदभार स्वीकारणार आहेत. सोमवारी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आजच महासंचालकपदाचा कार्यभार संभाळणार आहेत. (Rashmi Shukla reappointed as Maharashtra DGP)

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. सक्तीच्या रजेचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. निवडणूक कार्यक्रम संपल्यामुळे तसेच आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर शासनाकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

Rashmi Shukla news
Who is Rashmi Shukla : कोण आहेत रश्मी शुक्ला? महासंचालकपदावरून तात्काळ बदलीचं कारण काय?

रश्मी शुक्लांविरोधात आरोप काय आहेत?

महाविकास आघाडी सरकार असताना २०१९ मध्ये राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचे आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केले होते, असा आरोप शुक्ला यांच्यावर आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात ६ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. २०१६-१७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त असताना शुक्ला यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन अमजद खान या ड्रग माफियाच्या नावे टॅप केला होता. हा प्रकार उघड झाल्याने पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात होता.

Rashmi Shukla news
Maharashtra Politics : कोकणातील भाजपच्या विजयाचा शिल्पकार कोण? महायुती कोणामुळे मविआवर पडली भारी? वाचा

कोण आहेत रश्मी शुक्ला ?

रश्मी शुक्ला १९८८ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IPS अधिकारी आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणूनही शुक्ला यांनी काम केलंय. रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार्‍या पहिल्या महिला ठरल्या होत्या.

Rashmi Shukla news
Maharashtra Election Results : न भूतो न भविष्य! महायुतीचा तब्बल २३५ जागांवर विजय, मविआ चारीमुंड्या चीत

रश्मी शुक्ला काही काळ पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी होत्या. राज्याच्या गुप्तचर शाखेचे संचालकपदही रश्मी शुक्ला यांनी भूषवलं आहे.जून २०२४ मध्ये त्या सेवेतून निवृत्त होणार होत्या. पण सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. शुक्ला यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी केली होती. राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

Rashmi Shukla news
Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महायुतीकडून 2 फॉर्म्युला, पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com