Nagpur Rain Alert: Holiday Declared for Anganwadis, Schools and Colleges Across District saam tv
महाराष्ट्र

School Closed: नागपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी; हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

School Closed In Nagpur : भारतीय हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने जिल्हा प्रशासनाने शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.

Bharat Jadhav

  • नागपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

  • जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

राज्याची उपराजधानी नागपूर शहराला पावसाने झोडपून काढले. गेल्या अडीच तासांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली. भारतीय हवामान विभागाने ३० जुलेपर्यंत पावसाचा इशारा दिलाय. हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानं जिल्हा प्रशासनाने सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय.

शाळा सुट्टी आदेश २९ जुलै (नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा व कामठी).pdf
Preview

नागपुर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज मंगळवारी दुपारी २.३० वाजता पर्यंत नागपूर शहरात १०८ मिमी येवढ्या पावसाची नोंद झालीय. नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. आता भारतीय हवामान खात्याने नवीन हवामान अंदाज वर्तवला असून २९ जुलै रोजी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडला तर अनेक भागात अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता.

नागपूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालये मधिल विद्यार्थाना उद्या दिनांक २९ जुलै. २०२६ रोजी सुट्टी देण्यात आलीय. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

आज झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शहरातील शाळा आणि तेथील विद्यार्थ्यांना बसलाय. सोमलवार शाळेचे मैदान पाण्याखाली, खामल्यात बिकट परिस्थिती निर्माण झालीय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील नामांकित सोमलवार शाळेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप आलंय. खामला परिसरातील शाळेत परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. खामला भागातील शाळेच्या आवारात आणि मैदानात तब्बल साडेतीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Serial : मनोरंजनाचा नवा धमाका! ती परत आलीय..., नागिनच्या रुपात कोणती अभिनेत्री? VIDEO नं वेधलं लक्ष

Mumbai: सातवा वेतन आयोगासाठी बेस्ट कर्मचारी आक्रमक; आजपासून बेमुदत उपोषण

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख 62 हजार मतदारांचा शोध लागेना

ठाकरे की शिंदे, शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? आज पुन्हा महत्त्वाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

SCROLL FOR NEXT