Nagpur Ramtek Accident saam
महाराष्ट्र

Nagpur : शेतात कामाला जाताना कारने चिरडले, २ महिलांचा जागीच मृत्यू

Nagpur Ramtek Accident : नागपूरच्या रामटेकजवळ कांद्री माईन परिसरात भरधाव कारच्या धडकेत शेतात कामाला जाणाऱ्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक आणि इतर व्यक्तींनी कार सोडून पळ काढला.

Namdeo Kumbhar

  • दोन शेतमजूर महिलांना भरधाव कारने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.

  • अपघातानंतर चालक आणि कारमधील तिघेजण कार सोडून पळाले, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

  • संतप्त नागरिकांनी कार पेटवण्याचा प्रयत्न केला.

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

शेतामध्ये कामाला निघालेल्या दोन महिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. रामटेकजवळ एका भरधाव कारने दोन महिलांना उडवले. कारचा वेग अतिशय जोरात होता, त्यामुळे महिलांना जबर मार लागला अन् रूग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांचा उद्रेक झाला. संतापलेल्या लोकांनी कार पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून अपघाताची नोंद केली. अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नागपूरमधील रामटेकजवळील कांद्री माईन परिसरात भरधाव कारच्या धडकेत दोन शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला. मंदा उपासे (49) आणि प्रमिला शेंद्रे (41) अशी मृतक महिलांची नावे आहेत. दोन्ही महिला पायी शेतात कामावर जात होत्या. त्याचवेळी अचानक भरधाव वेगात असलेल्या कारने जोरदार धडक दिल्यानं मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने आणि कारमधील लोकांनी कार तिथेच सोडून पळ काढला. पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास करत ३ जणांना ताब्यात घेतले आहे.

कार अपघातानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त नागरिकांनी कारला आग लावण्याचा प्रयत्नही केला. पण काही स्थानिकांनी आग विझवली अन् पोलिसांना सूचना दिली. कारमधील कुणाल अहुजा, प्रशांत निसवानी आणि चालक सागर ठाकूर अपघातानंतर कार टोलजवळ सोडून पळाले होते. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. आंदोलकांनी दुभाजक काढल्यामुळे वाढलेले अपघात, पथदिव्यांचा अभाव यांसह सुरक्षेच्या मुद्यांवर नाराजी व्यक्त केली. रामटेक SDPO रमेश बरकते यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Deodhar Mangalsutra Designs: पाठक बाईंच्या मंगळसूत्राची महिलांना क्रेझ, हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न

Banarasi Saree Designs: बनारसी साड्यांचे हे 5 लेटेस्ट पॅटर्न, ट्रेडिशनल टू मॉडर्न लूक दिसेल भारी

Maharashtra Live News Update: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला लहान मुलांनसोबत घ्या पतंग उडविण्याचा आनंद

Valentine Day Love Letter: प्रवासात 'ती' आठवली अन् डोळे पाणावली! अपूर्ण प्रेमाची स्वप्ने पत्रात रंगवली

SCROLL FOR NEXT