Vande Bharat Express Saam Tv
महाराष्ट्र

Vande Bharat Express : नागपूर-पुणे वंदे भारत ट्रॅकवर कधी येणार, तिकीट किती? A टू Z माहिती

Nagpur-Pune Vande Bharat Express : नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कधी सुरू होणार? याकडे विदर्भातील लोकांच्या नजरा लागल्या आहेत. तिकीट किती असेल? कोण कोणते थांबे असतील?

Namdeo Kumbhar

Nagpur-Pune Vande Bharat Express Update : महाराष्ट्राला लवकरच आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहेत. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई यादरम्यान या वंदे भारत एकस्प्रेस धावणार आहेत. विदर्भातून मुंबई आणि पुण्याकडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या एक्सप्रेस ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज वर्तवला जातोय. नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार? याची उत्सुकता विदर्भातील नागरिकांना लागली आहे. या एक्सप्रेसला कुठे कुठे थांबा असणार? तिकीट किती असू शकते? याबाबतच्या चर्चेने जोर धरलाय.

नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरीही या मार्गावर ट्रेनची संख्या मर्यादीतच आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक लोकांना रस्त्यांने प्रवास करावा लागतो. पण आता वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्यानंतर विदर्भातील नागरिकांचा प्रवास आणखी सोपा आणि सूकर होईल. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास लोकांचा वेळ वाचणार आहे. त्याशिवाय आरामदायी रेल्वे प्रवासाचा अनुभवता येणार आहे.

नागपूरवरून दोन वंदे भारत निघणार ?

नागपूरला आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा मान मिळणार आहे. नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे यादरम्यान वंदे भारत धावण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेचे नागपूरचे डीआरएम विनायक गर्ग यांनी यासंदर्भात नुकताच एक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

नागपूरवरून किती वंदे भारत धावतात?

सध्या नागपूरवरून ३ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात. नागपूर-सिकंदाराबाद, नागपूर-इंदोर आणि नागपूर-भोपाळ या तीन एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. त्यात दोन एक्सप्रेस ट्रेनची भर पडणार आहे. नागपूर-पुणे आणि नागपूर मुंबई या दोन शहरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.

नागपूरवरून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नवीन गाड्या सुरू कऱण्यात याव्यात, अशी मागणी वारंवार होत होती. त्यामुळेच आता या मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय बोर्डाकडून परवानगी मिळाल्यानंतर वंदे भारत ट्रेन सुरू होतील.

वेळ किती लागतो?

नागपूर-मुंबई या प्रवासासाठी रेल्वेने सध्या सरासरी १२ ते १६ तासांचा वेळ लागतो. नागपूर-मुंबई यादरम्यान मर्यादीत रेल्वे आहेत. तर नागपूर-पुणे या दरम्यान सरासरी १५ तासांचा वेळ लागतो. सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर हा वेळ वाचेल. नागपूर-पुणे हा वेळ ८ ते १० तासांवर येण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे नागपूर मंडळांनी प्रवाशांची गरज आणि नागपूर पुणे आणि मुंबईसाठी लागणारा अधिक प्रवास कालावधी कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.

नागपूर-पुणे वंदे भारत कुठे कुठे थांबणार?

वर्धा, धामणगाव,अकोला,शेगाव,भुसावळ,जळगाव,चाळीसगाव मनमाड, दौंड स्टेशनवर नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनचा थांबा असण्याची शक्यता आहे. दरम्यान, वंदे भारत ट्रेनच्या तिकीट आणि टाइम टेबल संदर्भात सध्या अधिकृत अधिकृत घोषणा केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT