नागपूर - मध्यवर्ती कारागृहात गांजा आणि मोबाइल बॅटरी मिळण्याच्या प्रकरणात नागपूर (Nagpur) पोलिसांच्या (Police) गुन्हे शाखेने आज सकाळपासून जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले, ज्यानंतर पोलीस प्रशासनही स्तब्ध झालं. सुमारे 200 पोलीस कर्मचारी यांच्याकडून सेंट्रल जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये श्वानपथकाचीही मदत घेण्यात येत आहे.
या सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून जेलमधील सर्व पुरुष बॅरकमध्ये कारवाई होणार आहे. काही कैदी जेलच्या आतून सर्रास मोबाइल फोनचा वापर करत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
हे देखील पाहा -
सूरज कावडे नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडे गांजा आणि मोबाइल बॅटरी सापडल्या होत्या. काल दुपारच्या सुमारास पोलीस कर्मचारी सूरजला घेऊन कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले. सूरजकडे कागदपत्रांच्या फायली होत्या.
परंतु फाइलचे वजन जास्त वाटत असल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी फाईलची तपासणी केली असता त्यात गांजा व बॅटऱ्या आढळून आल्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती तुरुंग प्रशासनाला माहिती दिली. पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांनी सूरजची प्राथमिक चौकशी केली. अंडरट्रायल कैदी असल्याने त्याला कारागृहात नेण्यात आले आणि गांजा व सर्व बॅटरी जप्त करण्यात आल्या.
याच प्रकरणात तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे आज पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन सुरू केले. सूरज याच्याकडे फक्त मोबाइलच्या बॅटरी सापडल्या असून मोबाइल कुठे आहे याचा काहीच पत्ता नाही. पोलिसांकडून आता या मोबाईलचा देखील शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणामुळे शहर पोलीस व कारागृह प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सूरज कवळे हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, दरोडा, मारहाण, चोरी यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करत त्याला अटक केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.