बाळासाहेब थोरात यांनी सहकुटुंब घेतलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने, चैत्यनाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam Tv

सचिन जाधव

पुणे - काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मी आलो होतो, कोरोनाच (Corona) २ वर्षाचं संकटामुळे आपण मागील २ वर्ष गणेशोत्सव साजरा करू शकलो नाही.

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने, चैत्यनाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या कालखंडामध्ये जीवनातल्या व्यथा असल्या, काळजी असली, दुःख असलं हे सर्व विसरून गणपतीची आराधना करतात लोक, श्रींची आराधना करतात आणि पुढच्या सौख्य करता प्रार्थना करतात.

हे देखील पाहा -

सर्व समाजाच्या देशाच्या सौख्यकरता प्रार्थना करण्याची कालखंड आहे असं म्हणल तरी वावग ठरत नाही. ४० वर्षापेक्षा जास्त काळ सहकुटुंब मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला येत असतो. प्रार्थना करतो, आशीर्वाद घेतो आणि माझ्या जीवनात माझ्या कुटुंबाच्या जीवनात हे आशीर्वाद खूप उपयोगी येतात अस माझं पक्क मत असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

Balasaheb Thorat
मावळात सोयाबीन पिकावर ड्रोन द्वारे कीटकनाशक फवारणी; पाणी आणि मजुरांची बचत

पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, बाप्पाकडे मागणी हीच आहे की, सध्या समाजामध्ये भेद निर्माण होत आहेत यामधून देशांमध्ये अस्थिरतेच वातावरण, दूषित वातावरण निर्माण होत आहे ते दूर करावं, संपूर्ण समाज ही देशाची विविधता एक व्हावी आणि ती देशाची ताकद बनावी ही प्रार्थना केलीच आहे. त्यासोबत वाढती ही सुद्धा काळजीचा विषय आहे, बेरोजगारीचा विषय आहे कुठंतरी हे सगळं दुःख आहे ते दूर व्हावेत आणि एक समृद्ध वातावरण देशामध्ये निर्माण व्हावं याकरिता मी प्रार्थना केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com