नागपूर पोलीस आता करणार चंदनाच्या झाडांची सुरक्षा! संजय डाफ
महाराष्ट्र

नागपूर पोलीस आता करणार चंदनाच्या झाडांची सुरक्षा!

आता शहरातील चंदनाची झाडं शोधून त्यांची सुरक्षा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यामुळं या अजब आदेशाची शहरात सर्वत्र चर्चा आहे.

संजय डाफ

संजय डाफ

नागपूर : नागपूरात Nagpur एकीकडे गुन्हेगारी Crime वाढत असताना ही गुन्हेगारी ठेचून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यात आता शहरातील चंदनाची झाडं Sandalwood Tree शोधून त्यांची सुरक्षा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यामुळं या अजब आदेशाची शहरात सर्वत्र चर्चा आहे.

हे देखील पहा-

नेमके प्रकरण;

12 जुलै ला पोलीस उपायुक्त नरुल हसन यांच्या शासकीय बंगल्यातील चंदनाची झाडं चोरीला गेली होती. थेट पोलीस उपयुक्तांच्या शासकीय बंगल्यात चोरी झाल्यानं शहरात पोलिसांचा शहरात धाक राहिला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळं आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. तब्बल 17 दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणानंतर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील चंदनाची झाडं शोधून त्यांचं रक्षण करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यामुळं गुन्हेगारी रोखायची की चंदनाच्या झाडांचं रक्षण करायचं असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

आधीच शहरात पोलिसांची संख्या कमी आहे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे, त्यात आता चंदनाची झाडं शोधून त्यांची सुरक्षाही पोलिसांना करावी लागणार असल्यानं पोलिसांवरचा ताण वाढणार आहे.

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT