Nagpur Murder  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Murder: मैत्रणीकडून मैत्रणीची हत्या, मोबाईल नंबरवरुन काहीच तासात गुन्ह्याचा छडा

नागपुरात स्कूल बसवर वाहक असलेल्या दीपा दास यांचा मृतदेह प्लस्टिकच्या पिशवीत आढळून आला होता.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपुरात मैत्रणीनेच मैत्रणीची हत्या केल्याचं प्रकरण पुढे आलंय. नागपुरात स्कूल बसवर वाहक असलेल्या दीपा दास यांचा मृतदेह प्लस्टिकच्या पिशवीत आढळून आला होता. कपिल नगर पोलीस ठाण्याअंतर्गत उप्पलवाडी परिसरात महिलेच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली होती (Nagpur Police Solve Murder Case Of Female Conductor From Mobile Number).

41 वर्षीय दीपा दास या स्कूल बसवर वाहक आहेत. नागपूरच्या (Nagpur) उप्पलवाडी परिसरात त्यांचा मृतदेह (Deadbody) हातपाय बांधून एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत फेकला होता. महिला हत्येच्या (Murder) घटनेने शहरात खळबळ उडाली होती. नेमकी ही हत्या कुणी आणि कशासाठी केली, असे प्रश्न पोलिसांसमोर (Nagpur Police) होते.

पोलिसांनी या महिलेच्या मोबाईलवरुन (Mobile) आरोपीचा शोध घेतला. दीपा दास यांनी स्वर्णा सोनी यांना एक लाख रुपये उधार दिले होते. मात्र, पैसे परत न मिळाल्याने दोघींमध्ये वाद सुरु होता. काल दीपा या स्वर्णाकडे पैसे परत मागण्यासाठी गेल्या. दरम्यान, यावरुन दोघींमध्ये वाद निर्माण झाला. यातून स्वर्णा आणि तिचा पती सामी सोनी या दोघांनी तिचा गळा आवळून हत्या (Murder) केली आणि मृतदेहाचे हातपाय बांधून एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत टाकून फेकून दिला.

पोलिसांपुढं या हत्येच्या तपासाचं मोठं आव्हान होतं. मात्र, मोबाईल क्रमांकावरुन तपास करत नागपूर पोलिसांनी आरोपींचा छडा लावला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime: १० वर्षांच्या मुलाचं अपहरण करून हत्या, कालव्यात आढळला मृतदेह; सोलापूर हादरले

Maharashtra Tourism: शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग...; महाराष्ट्रातील 'या' ऐतिहासिक जिल्ह्याला एकदा तरी भेट द्याच

राज ठाकरे हे राजकीय कचराकुंडीत गेलेत; दुबेनंतर आता तिवारी बरळले| VIDEO

Maharashtra Live News Update: राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चितळ हरणे 'क्वारंटाईन'

Jalna News : हॉटेल बंद न केल्याने तरुणांची सटकली, मालकाला लाठाकाठ्यांनी बेदम मारहाण, VIDEO

SCROLL FOR NEXT