अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नागपूर पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक' संजय डाफ
महाराष्ट्र

अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नागपूर पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'

सहा तासात 66 आरोपींना घेतलं ताब्यात!

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : अंमली पदार्थाविरोधात नागपूर पोलीस ऍक्शन मोड वर आले आहेत. नागपूर पोलिसांनी शहरात विशेष मोहीम राबवत अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई केलीय. शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई राबविण्यात आली.

हे देखील पहा :

या कारवाईत सहा तासांत पोलिसांनी तब्बल ६६ आरोपींना ताब्यात घेतलं. यात एक लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. नागपूरात अमली पदार्थाची तस्करी वाढल्यानं गुन्ह्यातही वाढ होत आहे.

त्यामुळं नागपूर पोलीस आयुक्तांच्या आदेशानं पोलीसांनी ही धडक कारवाई राबविण्यात आली. यात पाच जणांना अमली पदार्थ बाळगताना तर ६१ जणांना अमली पदार्थ सेवन केल्यामुळे ताब्यात घेतलं. आधी क्रिकेट बुकी आणि आता अमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी आपला फास आवळलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंबोलीमधील दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्कू टीमला यश

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

SCROLL FOR NEXT