Nagpur : गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून क्यू-आर कोड प्रणाली विकसित! SaamTvNews
महाराष्ट्र

Nagpur : गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून क्यू-आर कोड प्रणाली विकसित!

नागपुरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी परिमंडळ झोन चार चे डीसीपी नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून क्यू-आर कोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- मंगेश मोहिते

नागपूर : शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगार पोलीस विभागासाठी नेहमीच डोकेदुखी ठरले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्या गुन्हेगारी घटना नियंत्रणात आणण्यासाठी निर्ढावलेल्या गुन्हेगारांना वठणीवर आणणे गरजचे आहे. त्यासाठी पोलिसांची संबंधित ब्लॅकस्पॉटवर सातत्याने उपस्थिती रहावी म्हणून नागपूर पोलीस विभागाने तंत्रज्ञानाच्या मदतीने क्यू-आर कोड प्रणाली विकसित केली आहे. यामाध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांची रस्त्यावरील उपस्थिती वाढवण्यास मदत होत आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग आहे, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विकसीत करण्यात आलेली ही क्यू आर कोड पद्धत नेमकी कशा प्रकारे कार्यान्वित होते.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी परिमंडळ झोन चार चे डीसीपी नुरूल हसन यांच्याच संकल्पनेतून क्यू-आर कोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अवघे अडीच लाख रुपये खर्च करून हे सिस्टीम तयार करण्यासाठी आले आहे. येत्या काही दिवसात याचे फायदे दिसायला लागतील,

नागपूर पोलीस विभागाने तंत्रज्ञानाच्या मदतीने क्यू-आर कोड प्रणालीमध्ये शहरातील प्रत्येक झोन अंतर्गत ब्लॅक स्पॉट निवडण्यात आले आहेत, ज्या ठिकाणी नेहमीच गुन्हेगारांचा वावर दिसून आलेला आहे, अशा ब्लॅक स्पॉटवर पोलिसांनी क्यू-आर कोड लावले आहेत. या क्यू-आर कोडला स्कॅन करण्यासाठी चार्ली पथकाला आणि बिट मार्शल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ब्लॅक स्पॉटवर जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांने क्यू-आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याची नोंद नियंत्रण कक्षातील सॉफ्टवेअर मध्ये होत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांचा रस्त्यांवरील उपस्थिती वाढणार आहे,

रस्त्यांवर पोलिसांची उपस्थिती वाढेल -

शहरातील विशिष्ट भागात गुन्हेगारांचा वावर सर्वाधिक दिसून येत असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर पोलीस विभागाने गुन्हेगारी घटनांवर अंकूश लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपायोग करत ही क्यू-आर कोड प्रणाली विकसित केली आहे. या क्यूआर कोडच्या मदतीने पोलिस कर्मचाऱ्यांचा फिल्ड वरील उपस्थिती वाढणार आहे. पोलीस रस्त्यांवर दिसले की गुन्हेगारी आपसुकच नियंत्रणात येते, हा अनुभव असल्याने पोलिसांनी शहरातील तब्बल पंधराशेच्या वर ठिकाणी क्यूआर कोड चिटकावले आहेत. बंदोबस्तासाठी बाहेर पडलेल्या चार्ली आणि बिट मार्शलला त्या स्पॉटवर जाऊन क्यू-आर कोड स्कॅन करावा लागणार आहे.

क्यू-आर कोड प्रणाली आहे तरी काय :

नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याची हद्द तीन ते चार बिट मध्ये विभागण्यात आली आहे. प्रत्येक बीटमध्ये कमीत कमी पंधरा बीट पंचिंग पॉईंट निश्चित करून त्यावर वॉटरप्रूफ क्यू आर कोड बसविण्यात आले आहेत. अशाच प्रकारे परिमंडळच्या सहा पोलीस स्टेशनचे ३७७ बिट पंचिंग पॉईंट ठरवून सर्व पॉईंटवर सुद्धा क्यू-आर कोड बसवण्यात आले आहेत. त्या बीट पॉईंटवर कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि बीट मार्शल दिवसपाळी आणि रात्रीपाळीच्या वेळी प्रत्यक्षात स्पॉटवर जाऊन तो कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करतील. एका अप्लिकेशनच्या माध्यमातून सर्व डेटा पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालय आणि पोलीस ठाण्यातील निरीक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांकडून गस्त घालण्याचे प्रमाण वाढणार आहे, ज्यामुळे गुन्हेगार मोकळा श्वास घेऊन फिरू शकणार नाहीत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT