Nagpur Police
Nagpur Police Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : नागपूरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, उझबेकिस्तानच्या तरुणी पोलिसांच्या ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : शहरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील उच्चभ्रू परिसरात देहव्यापार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये नागपूरच्या पोलिसांनी (Police) धाड टाकल्यानंतर उझबेकिस्तानच्या दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आलं. या हॉटेलमध्ये दोन विदेशी तरूणी सेक्स रॅकेट चालवत असल्याची खबर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या तरुणींकडे भारतीय नागरिक असल्याचे काही कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. (Nagpur police arrested uzbekistan girls allegedly running brothel)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये उझबेकिस्तानच्या दोन तरुणींकडून देहव्यापार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला. त्यानंतर पोलिसांनी उझबेकिस्तानच्या दोन तरुणींना ताब्यात घेतलं. या तरुणी हॉटेलमध्येच राहत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत देहव्यापार चालवणाऱ्या तरुणींच्या मुसक्या आवळल्या.

त्यांच्याकडून महत्वाची कागपत्रे जप्त केली. दरम्यान, या तरुणींकडे त्यांचा ओरिजनल पासपोर्ट मिळाला नाही. पासपोर्टशिवाय या तरूणी नागपूरला आल्याने पोलिसांनी कसून चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं. बोगस कागदपत्रे कोणाच्या मदतीनं तयार केली, याचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : राजेंद्र गावित यांचा भाजप प्रवेश, पालघरमध्ये शिंदे गटाला धक्का

Rupali Chakankar On Rohit Pawar | रोहित पवारांच्या आरोपावर चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया

Akola Crime News: सासू सतत घ्यायची चारित्र्यावर संशय; संतापलेल्या जावयानं कायमचं संपवलं, नेमकं काय घडलं ?

Solapur Lok Sabha Election | सोलापूरमध्ये EVM मशीन बिघडली, मतदारांचा खोळंबा

Kharif Crop Loan : खरीप हंगामासाठी पीक कर्ज; शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा

SCROLL FOR NEXT