Akola Crime News: सासू सतत घ्यायची चारित्र्यावर संशय; संतापलेल्या जावयानं कायमचं संपवलं, नेमकं काय घडलं ?

Son In Law killed Mother In Law: अकोला जिल्ह्यात जावयाने सासुची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्या केल्यानंतर जावयाने अपघाताचा बनाव रचला होता.
जावयाने केली सासुची हत्या
Akola Crime NewsSaam Tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

विदर्भातील अकोला जिल्ह्यातून अकोट ग्रामीण पोलिसांनी एक हत्याकांड (Akola Crime News) उघडकीस आणले आहे. या हत्याकांडात अपघात असल्याचं बनाव रचण्यात आला होता. दरम्यान एका ६० वर्षीय महिला आपल्या जावयावर संशय घेत होती, त्यातून अनेकदा दोघांचे वाद व्हायचे.

याच रागाच्या भरातून जावयानं थेट सासूला कायमच संपवलंय. परंतु सासुचा मृत्यू अपघाती असावा, असं दर्शवन्यासाठी त्याने सासूचा मृतदेह रामापूर शेतशिवारातील विहिरीत फेकून दिला होता. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, वैद्यकीय अहवालात सर्व बिंग फुटलं. जावयानं केलेलं कृत्य पोलिसांनी ४ दिवसांतच उघड केलं आहे. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं ३ मे रोजी काय घडलंय?

३ मे रोजी सकाळीच अकोट तालुक्यातील ग्राम धारुळ पुनर्वसित गाव येथील कमलाबाई गंगाराम बेठेकर (वय 60) या इंधन आणण्यासाठी सकाळीच शेतशिवाराकड़ं निघाल्या (Son In Law killed Mother In Law) होत्या. दुपारची वेळ उलटूनही कमलाबाई घरी न परतल्याने त्यांचा मुलगा आईच्या शोधार्थ बाहेर पडला. रामापुर शेतशिवारात मुलगा पोचला असता एका विहिरीत त्याने डोकावून पाहलं असता. विहीरित आईचा मृतदेह पडून दिसून आला. त्याने याची माहिती लागलीच अकोट ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं.

गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. कदाचित तोल गेल्याने कमालाबाईचा विहिरीत पडून मृत्यु झाला असावा, अशी शक्यता घटनास्थळी वर्तवण्यात येत होती. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. दोन दिवसानंतर वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यामधून काही धक्कादायक खुलासे उघड झाले.

जावयाने केली सासुची हत्या
Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

नेमकं काय होतं वैद्यकीय अहवालात?

कमलाबाई गंगाराम बेठेकर यांच्या वैद्यकीय अहवालात काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. त्यांच्या गळ्यावर धारधार अवजारानं जखम केल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळ त्यांचा मृत्यु झाल्याची शक्यता (crime news) वर्तविली जात होती. अशा प्राप्त अहवालाच्या आजारावर अकोट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बोडखे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान बोडखे यांना मृत महिलेच्या जावयावर संशय झाला. त्याला ताब्यात घेत त्याची विचारपुस केली.

अर्जुन शंकर कासदेकर, असं मारेकरी जावयाचं नाव आहे. तो धारुड इथेच राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन याची पत्नी त्याला सोडून गेली. तेव्हापासून तो त्याच्याच सासरवाडीत राहत (akola news) होता. राहण्यापासून तर जेवणापर्यंत सर्वकाही सासूकडेच असायचं. दरम्यान काही दिवसांपूर्वी सासूला त्याच्यावर संशय आला. जावई आपल्या मुलाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवतोय, असं तिला वाटु लागलं. त्यातून त्यांचे अनेकदा वाद झाले. त्यानंतर जावयाला घरात घ्यायला कमलाबाईंनी स्पष्ट विरोध केला. याचाच राग त्याच्या मनात घर करून बसला. त्याने सासूला कायमचं संपवण्याच निश्चित केला. दरम्यान ३ मे रोजी दुपारच्या सुमारास रामापुर शेत-शिवारात सासू त्याला एकटी दिसली. त्याने जवळील धारदार अवजारानं सासूच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर सासुचा मृतदेह विहिरीतच फेकून दिला. दरम्यान सद्यस्थितीत अर्जुन कासदेकर हा पोलिसांच्या अटकेत आहे. त्याच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलिससांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावयाने केली सासुची हत्या
Sambhajinagar Crime : जमिनीसाठी दुसऱ्यांदा मजूर महिलांवर हल्ला; जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पाडून नऊ वाहने जाळली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com