Ntin Gadakari Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari News : नितीन गडकरी यांच्या नावाने 'फेक पोस्ट'; नागपूर पोलिसांनी केली मोठी कारवाई

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने फेक पोस्ट प्रकरणी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

संजय डाफ

Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने फेक पोस्ट प्रकरणी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नागपूर पोलिसांकडून फेक पोस्ट प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितिनुसार, नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नावे फेक पोस्ट करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपी हा ठाकरे गटाचा आर्णी तालुका अध्यक्ष असून प्रविण देशमुख असे त्याचे नाव आहे. आरोपी प्रवीण देशमुख सध्या नागपूर सायबर सेलच्या ताब्यात होता.

नागपूर (Nagpur) पोलिसांच्या सायबर सेलने प्रवीण देशमुखची चार तास चौकशी केली. चौकशीनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला सूचनापत्र देऊन सोडण्यात आलं आहे. कसबा निवडणुकीनंतर त्याने नितीन गडकरी यांच्या नावाने फेक मॅसेज व्हायरल केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने फेक पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. या फेक पोस्टमध्ये नितीन गडकरी राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या देण्यात आल्या होत्या. पण ही पोस्ट फेक (खोटी) असल्याचे गडकरी यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. याप्रकरणी गडकरी यांच्या कार्यालयाकडून नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, नागपूर पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली असून गडकरी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या तक्रारीनंतर नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded : नांदेडमध्ये ग्रामसभेत तुफान राडा, गावकऱ्यांनी एकमेकांना तुडवलं; चौघे जखमी | पाहा VIDEO

Navratri 2025: नवरात्रीतील ९ दिवसांसाठी देवीला कोणते नैवेद्य अर्पण करावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत पुन्हा नोंदणी सुरू होणार? सरकारकडे केली मागणी, काय निर्णय होणार?

Hair Growth Tips: आजपासून जेवणात हे पदार्थ खा, मुळापासून होईल केसांची वाढ

SCROLL FOR NEXT