नागपूरात आता कोरोना लसीच्या पहिल्या डोजसाठी मोजावे लागणार पैसे Saam Tv
महाराष्ट्र

नागपूरात आता कोरोना लसीच्या पहिल्या डोजसाठी मोजावे लागणार पैसे

महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरील मोफत लसीकरण होणार बंद; एक डिसेंबर पासून अंमलबजावणी

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - एक डिसेंबरपासून कोरोना लसीच्या पहिल्या डोजसाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. महानगरपालीकेच्या लसीकरण केंद्रांवर पहिल्या डोजची निःशुल्क सेवा बंद केली जाणार आहे. मोफत लसीकरणाचं काही नागरिकांना गांभीर्य दिसत नाही. त्यामुळं मोफत लसीकरण बंद करणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

नागपूरात १४ टक्के लोकांनी अद्यापही कोरोना लस घेतलेली नाही. कोरोना लसीबाबत झोपडपट्टी आणि काही समुदायांमध्ये अजूनही संभ्रम आहे. तब्बल २ लाख ७० हजार लोकांनी आतापर्यंत पहिला डोज घेतलेला नाही. मात्र, ३० नोव्हेंबर पर्यंत पहिला डोज पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून जनजागृती सुरु आहे.

नागपूरात १८ वर्षावरील नागरिकांची संख्या १९ लाख ८३ हजार इतकी आहे. तर आतापर्यंत १६ लाख ८७ हजार नागपुरकरांनी घेतली कोरोनाची लस घेतली आहे. शहरातील आशीनागर झोन, सतरंजीपुरा, गांधीबाग, लकडगंज परिसरात कमी लसीकरण झालंय. त्यामुळं लसीकरणाबाबत गांभीर्य वाढावं यासाठी मोफत लसीकरण बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना झालेल्या तोडफोड प्रकरणी शंभराहून अधिक जणांवर गुन्हा दाखल

Sleepy After Lunch : दुपारच्या जेवणानंतर झोप येतेय? मग हे पदार्थ खाणं आत्ताच टाळा

Malegaon : मालेगावात पुन्हा शिक्षक भरती घोटाळा; २ कोटी ६९ लाखात फसवणूक केल्याचे उघड, पाच जणांवर गुन्हा दाखल

Khodala Waterfall: मुंबईपासून जवळ असलेल्या धबधब्यावर भिजायचा प्लान करताय? 'हा' स्पॉट ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन

मला xxx काढता का? तुमचा माज...; अजित दादांच्या आमदाराची जीभ घसरली, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT