ST Bus Strike: संपामुळे एसटीच्या पुणे विभागाला ६० लाखांचा फटका

या आंदोलनामुळे एसटीने प्रवास करणार्‍या 1 लाख 20 हजार प्रवाशांची मोठी फरफट झाली आहे. नियोजित 1600 च्या घरात फेर्‍या रद्द झाल्या आहेत.
ST Bus Strike: संपामुळे एसटीच्या पुणे विभागाला ६० लाखांचा फटका
ST Bus Strike: संपामुळे एसटीच्या पुणे विभागाला ६० लाखांचा फटकाSaam TV
Published On

पुणे: सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुणे एसटी विभागाला मोठं आर्थिक नुकसान होत आहे. सोमवारी एसटीच्या पुणे विभागाला 60 लाखांचा फटका बसला आहे. सरकारने काढलेला अध्यादेश कर्मचाऱ्यांना मान्य नाही त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळून एसटीला आणखी मोठा आर्थिक फटका बसू शकतो. (60 lakh loss to Pune section of ST bus due to strike)

हे देखील पहा -

पुण्यातील शिवाजीनगर एसटी डेपो बाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आहे. मात्र या आंदोलनामुळे दैनंदिन एसटीने प्रवास करणार्‍या 1 लाख 20 हजार प्रवाशांची विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी मोठी फरफट झाली आहे. नियोजित 1600 च्या घरात फेर्‍या रद्द झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात 13 डेपोंमार्फत मिळणारे 60 लाखांचे एकदिवसीय उत्पन्न एसटीला गमवावे लागले. तर 1 लाख 20 हजार प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागला.

स्वारगेट स्थानकाला 28 लाखांचा फटका

स्वारगेट एसटी स्थानकाचे दैनंदिन उत्पन्न: 26 ते 28 लाख

दैनंदिन प्रवासी संख्या: 30 हजार

स्वारगेट डेपोच्या गाड्या: 110 एसटी बस (शिवनेरी, लालपरी, शिवशाही)

दैनंदिन रद्द झालेल्या फेर्‍या: 1000 ते 1200

ST Bus Strike: संपामुळे एसटीच्या पुणे विभागाला ६० लाखांचा फटका
नंदुरबार : दुसरा दिवसही संपाचा; बस आगारात बंद

शिवाजीनगर स्थानकाला 28 लाखांचा फटका

शिवाजीनगर एसटी स्थानकाचे दैनंदिन उत्पन्न: 30 ते 35 लाख

दैनंदिन प्रवासी संख्या: 25 ते 30 हजार

स्वारगेट डेपोच्या गाड्या: 162 एसटी बस (शिवनेरी, लालपरी, शिवशाही)

दैनंदिन रद्द झालेल्या फेर्‍या: 325 ते 750

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com