Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : अल्पवयीन मुलाच्या प्रेमात बुडाली; फूस लावून मुलाला पळविले, एका पोस्टने पितळ पडले उघडे

Nagpur : नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार घडला आहे. याच परिसरात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर सदर ३६ वर्षीय महिलेचे प्रेम जडले. महिलेने या मुलाला आपल्या प्रेमात ओढले

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : प्रेमाला वयाचा बंधन नसते. प्रेम कधी आणि कोणासोबत होईल हे सांगणे जरा कठीणच झाले आहे. असाच प्रत्यय नागपूरमध्ये आला आहे. या घटनेत एका ३६ वर्षीय महिलेचे अल्पवयीन मुलांसोबत प्रेम जुडले. परंतु या महिलेला अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध चांगलेच महागात पडले असून सध्या महिला पोलीस कोठडीत पोहचली आहे.

नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार घडला आहे. याच परिसरात वास्तव्यास असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर सदर ३६ वर्षीय महिलेचे प्रेम जडले. महिलेने या मुलाला आपल्या प्रेमात ओढले. यानंतर तिने मुलाला फुस लावून पळवून नेलं. अल्पवयीन मुलांसोबत प्रेमसंबंध जुळल्याने तो महिलेसोबत निघून गेला होता. परंतु मुलगा घरी न आल्याने घरच्यांनी अपहरण झाल्याची तक्रार लकडगंज पोलिसांत नोंदवली.

चार महिने राहिले सोबत 

तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी तपासास सुरवात केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलाला महिलेने पळवून नेल्याचे दिसून आले होते. त्यानुसार तपास सुरु केला. आरोपी महिलेचे आणि मुलाचे प्रेम संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून महिलेनं मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून पळून बालाघाट येथे घेऊन गेली होती. ते दोघेही तिथं चार महिने राहिले. मात्र मुलाचा शोध लागला नव्हता. 

मुलाने पोस्ट शेअर केल्याने लागला शोध 

याच दरम्यान मुलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर केल्यानंतर बालाघाटला असल्याचं समजलं. त्यानंतर नागपूर पोलिसांनी महिलेचा आणि मुलाचा शोध घेत बालाघाट येथून दोघांना नागपुरात आणले. महिलेला अल्पवयीन मुलाला फूस लावल्याचा गुन्ह्यात अटक केली. तर सदर मुलाला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT