Threat to Union Minister Nitin Gadkari for 10 crores extortion saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी, राज्याच्या राजकारणात खळबळ

Nitin Gadkari Threatened : नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आल्याची माहिती आहे. या बातमीनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

Chandrakant Jagtap

>>संजय डाफ, नागपूर

Nagpur Breaking : राज्याच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना खंडणीच्या मागणीसाठी धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आल्याची माहिती आहे. या बातमीनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा कॉल आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे धमकीचे कॉल आहे. मंगळवारी सकाळी दोन वेळा कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे कॉल आले.

या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली अशी माहिती आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना याबाबात माहिती दिली आहे. यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात आज सकाळी धमकीचे दोन फोन आले. या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. हे कॉल जयेश पुजारी नावाने आले असल्याची तक्रार गडकरींच्या कार्यालयाने पोलिसांना दिली आहे.

दरम्यान, नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी गडकरी यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. या धमकीची वास्तविकता ते तपासत आहेत. हा केवळ खोडसरपणा की गंभीर बाब आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यापूर्वी देखील 14 जानेवारी रोजी बेळगाव तुरुंगातून गडकरी यांना कॅाल आले होते, त्याच जयेश पुजारीच्या नावाने पुन्हा गडकरींना धमकी देण्यात आली आहे. (Nagpur News)

यापूर्वी 14 जानेवारी रोजी नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात 3 वेळा धमकीचे कॉल आले होते. सकाळी 11 वाजता पहिला, 11.30 वाजता दुसरा आणि त्यानतंर दुपारी 12 वाजता हे कॉल आले. या कॉलवरून दाऊदच्या आवाजात गडकरींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धक्कादायक बातमीनंतर नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

SCROLL FOR NEXT