Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : दारूच्या व्यसनाने वडिलांचा मृत्यू; संतापातून मुलगा बनला चोर, वाईन शॉप केले टार्गेट

Nagpur News : दारूच्या व्यसनामुळे वडिलांचा जीव गेल्याने यास वाईन शॉप कारणीभूत मानत त्याठिकाणी जाऊन चोरी करण्याचे मुलाने ठरविले, अशा प्रकारातून ८ वाईन शॉपमध्ये चोरी केल्याचे उघड

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : दारूचे व्यसन अधिक प्रमाणात झाले होते. या दारूच्या व्यसनामुळे दही वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला होता. मात्र दारूमुळे वडिलांचा जीव गेल्याचा संताप मुलाच्या मनात राहिला. यातून मुलाने चोरीचा मार्ग अवलंबला आणि बार व वाईन शॉप टार्गेट करत याच ठिकाणी चोरी केली. बार आणि वाईन शॉपला टार्गेट करून चोरी करणाऱ्यास पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. 

नागपूर शहरात हा प्रकार उघडकीस आला असून पाचपावली पोलिसांनी राजा खान उर्फ राजा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काही वर्षापूर्वी दारूच्या अधिक सेवनाने राजा खान याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बार चालक आणि वाईन शॉप चालका विरोधात राजाच्या मनात संताप होता. या संतापात रात्रीच्या वेळी बार व वाईन शॉपमध्ये जाऊन चोरी केल्याचे समोर आले आहे. 

सीसीटीव्हीत झाला कैद 
बार चालकांविरोधात असलेल्या संतापात राजा खान याने चोरी करण्याचे ठरविले. दरम्यान ३१ जुलै रोजी त्याने राणी दुर्गावती चौकातील मयुरी सावजी बारमध्ये अशीच चोरी केली. तेथून रोख रक्कम ३६ हजार रुपये आणि सिगारेटची पाकिटे असा ४० हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी मालक निलेश देवानी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली. 

८ दुकानामध्ये केली चोरी 

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यात चोरी करताना राजा कैद झाला होता. यावरून पोलिसांनी आरोपी राजाला अटक केली आहे. त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याने नागपूर शहरातील जवळपास ८ दुकानात चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली. मात्र चोरीच्या पैशातून तो गांजाची नशा करत असल्याची बाब पोलिस चौकशीतून समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : जरांगे नावाची काडी होती, तिला ज्वालामुखी करण्यासाठी पवार-ठाकरे जबाबदार - हाके

Manoj Jarange patil : मराठा आरक्षणासाठी जिवाचे रान, मनोज जरांगेंचा १५ वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो व्हायरल!

Weather Update : अकोल्याला पावसाचा फटका, नागरिकांना पाण्याने वेढले; पाच जणांचा थरारक रेस्क्यू

Maharashtra Live News Update: लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत- उद्धव ठाकरे

Param Sundari Review: 'चेन्नई एक्सप्रेस'ची कॉपी आहे 'परम सुंदरी'? वाचा प्रेक्षकांचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT