Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : पप्पा..पप्पा..म्हणत चिमुकलीने हंबरडा फोडला; याचना कोणापर्यंत पोहचलीच नाही, डोळ्यादेखत पित्याचे छत्र हरपले

Nagpur News : नागपूर जिल्ह्याचा नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथील तलावात सदरची घटना घडली आहे. यात बाजारगाव येथील अखिल नामदेव शिंदे (वय ३२) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: गावापासून जवळच असलेल्या तलावाकडे मुलीला घेऊन फिरण्यासाठी गेले. थोडे फिरल्यानंतर मुलीला घेऊन अंघोळ करण्यासाठी तलावात उतरले. मात्र पाय घसरून तलावात पडलेल्या आपल्या पित्याला कोणी तरी येऊन वाचवेल, म्हणून चिमुकलीने आरोड्या मारल्या. वडील बुडत असल्याचे पाहून पप्पा..पप्पा.. म्हणून हंबरडा फोडत रडत राहिली. परंतु या चिमुकलीचे याचना कोणापर्यत न पोहचल्याने पित्याचे दुर्दैवाने तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

नागपूर जिल्ह्याचा नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथील तलावात सदरची घटना घडली आहे. यात बाजारगाव येथील अखिल नामदेव शिंदे (वय ३२) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. तर एंजल असे पित्याचा मृत्यू पाहणाऱ्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून मुलीचा हंबरडा ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आले होते. 

पायरीवरून पाय घसरून तलावात पडला 

दरम्यान अखिल शिंदे हा पत्नी काजल आणि मुलगी एंजल या कुटुंबासह राहत होता. गावातच एक छोटेसे सलूनचे दुकान चालवत होता. तर सोमवारी दुपारी अखिल शिंदे हे मुलगी एंजल हिला घेऊन गावाजवळील तलावात आंघोळ करण्यासाठी गेले होते. तलावात उतरत असताना पायरीवर साचलेल्या चिखलामुळे अखिलचं पाय घसरल्याने थेट पाण्यात पडला. त्यांना पोहता न येत असल्याने काही क्षणातच तो पाण्यात बुडाला. 

चिमुकीच्या डोळ्यादेखत वडिलांचे छत्र हरवले

हे सर्व दृश्य तलावाच्या काठावर उभी असलेली साडेतीन वर्षाची एंजल पाहत होती. आपले वडील पाण्यात बुडत असून काही क्षणात दिसेनासे झाल्याने मुलीने हाक दिली. हंबरडा फोडून रडली, मात्र तिथं कोणीच नसल्यानं मदतीसाठी कोणीच येऊ शकले नाही. यामुळे या चिमुकीच्या डोळ्यादेखत वडिलांचे छत्र हरवले. दरम्यान बराच वेळ मुलगी तेथेच पप्पा.. पप्पा आरोड्या मारत रडत बसलेली पाहून ग्रामस्थांच्या घटना लक्षात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT