Nagpur NCP Saam TV
महाराष्ट्र

Nagpur: चारचा प्रभाग रचनेला राष्ट्रवादीचा विरोध; भाजपने फायद्यासाठी बदल केल्याचा आरोप

महाविकास आघाडीने घेतलेला तीनच्या प्रभाग पद्धतीचा निर्णय रद्द करत चारच्या प्रभाग पद्धतीनुसार महानगरपालिका निवडणूक होणार आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Government) आधीच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली तर अनेक निर्णयांमध्ये बदल केले. अशातच आता महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने घेतलेला तीनच्या प्रभाग पद्धतीचा निर्णय रद्द करत चारच्या प्रभाग पद्धतीनुसार महानगरपालिका निवडणुका होणार आहेत.

नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) निवडणुकीतंही चारचा प्रभाग राहणार आहे. नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) याचा विरोध केला आहे. तसंच १५ वर्षांत सत्तेत असताना नागपूरात भाजपने काहीही केलं नाही.

पाहा व्हिडीओ -

त्यामुळे भाजपला (BJP) पराभव दिसत असल्याने, आपल्या फायद्यासाठी चारचा प्रभाग केला असल्याचा आरोप नागपूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केला आहे. शिवाय महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्यातंही पेठे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने नियमबाह्य पद्धतीने प्रभाग रचना केली होती, त्यामुळं आमचा त्याला विरोध होता, राज्य सरकारनं त्यासाठी जुनी प्रभाग रचना रद्द केल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी सांगितलं.

शिंदे - फडणवीस सरकारच्या नव्या निर्णयानुसार नागपूर महानगरपालिकेत १५१ नगरसेवक कायम राहणार आहे. नागपूरात १५६ पर्यंत वाढवण्यात आलेली नगरसेवकांची संख्या आता १५१ राहणार. त्यामुळे विरोधक या निर्णयाचा विरोध करत आहेत

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Chips Recipe: घरच्या घरी मुलांसाठी बनवा पौष्टिक बीटरुट चिप्स

Tejpatta Tea Benefits: तमालपत्राचा चहा पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे!

Baramati News : बारामतीचा वाली कोण? अजित पवारांचं मोठं विधान, पाहा Video

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Walnut: दूध की पाणी? अक्रोड कशात भिजवून खाणे जास्त फायदेशीर

SCROLL FOR NEXT