महिलेची मला व मुलांना जीवे मारण्याची धमकी; खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीचा गौप्यस्फोट

'माझ्या आणि कुटुंबियांच्या मानसिक त्रासाला कारणीभूत असलेल्या या महीलेविरोधात मी स्वतः केंद्रीय महिला आयोगाकडे देखील लवकरच तक्रार दाखल करणार.'
Rahul Shewale's Wife
Rahul Shewale's WifeSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई: खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी राहुल शेवाळे (Kamini Rahul Shewale) यांनी निवेदनाद्वारे एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.एक महिला गेल्या वर्षभरापासून मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं त्या या निवदेनात म्हटल्या आहेत.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून खासदार राहुल शेवाळे यांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या सदर महीलेविरोधात गेल्या वर्षीच आम्ही सायबर पोलीसांत तक्रार दाखल केली होती.

पाहा व्हिडीओ -

माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाने सदर महीलेविरोधात साकीनाका पोलिसांकडून (Sakinaka Police) FIR नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. तसेच, सदर महिला गेल्या वर्षभरापासून मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा गौप्यस्फोट देखील कामिनी शेवाळी यांनी केला आहे.

तसंच याविरोधात मी सर्व पुराव्यानिशी स्वतः गोवंडी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून या महीलेविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे. या महीलेकडून मला आणि माझ्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबवण्यासाठी पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्यात यावी, यासाठी आम्ही राज्य मानवी हक्क आयोगाकडेही दाद मागितली आहे.

Rahul Shewale's Wife
पुण्यातील FTII मध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या मानसिक त्रासाला कारणीभूत असलेल्या या महीलेविरोधात मी स्वतः केंद्रीय महिला आयोगाकडे (Central Commission for Women) देखील लवकरच तक्रार दाखल करणार आहे. आमचा न्यायव्यवस्था आणि पोलिसांवर विश्वास असून आम्हाला या प्रकरणात न्याय मिळेल, याची मला खात्री आहे असल्याचंही त्या या निवदेनात म्हटल्या आहेत

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com