Nagpur News Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: चेकपोस्‍टवर ट्रक चालकांकडून घेतले पैसे; मोटार वाहन निरीक्षक एसीबीच्‍या जाळ्यात

चेकपोस्‍टवर ट्रक चालकांकडून घेतले पैसे; मोटार वाहन निरीक्षक एसीबीच्‍या जाळ्यात

संजय डाफ

नागपूर : चेक पोस्ट क्रॉस करतांना आरटीओ अधिकाऱ्यांची हप्तेवसुली ही ट्रक चालकांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. त्‍यानुसार नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कांद्री चेक पोस्टवर ट्रक चालकाकडून लाच (Bribe) स्वीकारतांना परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. (Tajya Batmya)

नागपूर ग्रामीण परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक अभिजत मांजरे हे आपल्या साथीदाराच्या मदतीने खाजगी ट्रक चालकाकडून चेक पोस्ट पास करण्यासाठी लाच घेतात. पैसे न दिल्‍यास ट्रक चेक पोस्टवरून सोडत नसल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आली होती.

रात्री सापळा रचत पकडले

ट्रक चालकांनी कंटाळून लाचलुचपत विभागाने याची तक्रार केली. या तक्रारीनुसार बुधवारी (८ फेब्रुवारी) रात्री उशिरा लाचलुचपत विभागाने सापळा रचला. या दरम्‍यान चेक पोस्ट क्रॉस करण्यासाठी एका ट्रक चालकडून पाचशे रुपयाची लाच स्वीकारतांना अभिजित मांजरे, करण काकडे व विनोद लांजेवार यांना अटक केली. या घटनेनंतर वाहन निरीक्षक अभिजित मांजरे यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Shocking: बंजी जम्पिंग करताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, मानेचं हाड तुटलं नंतर...; थरारक VIDEO व्हायरल

Chandrakor Paithani Saree Blouse: चंद्रकोर पैठणी साडीवर ब्लाऊज कसा शिवायचा? हे आहेत 5 ट्रेडिंग पॅटर्न

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव डंपर घरावर कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू

Crispy Masala Peanuts : कुरकुरीत मसाला शेंगदाणे घरी कसे बनवायचे? वाचा एकदम सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT