Mohan Bhagwat Saam TV
महाराष्ट्र

Mohan Bhagwat Speech: 'हिंदुंनी दुर्बल राहणे अपराध...' सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन; मोदी सरकारलाही दिला खास संदेश

RSS Chief Mohan Bhagwat Speech Nagpur: काही जणांकडून भारत पुढे जाऊन स्पर्धक होऊ नये म्हणून उत्पाद केले जात आहेत. इस्त्राईलसोबत हमास युद्ध किती व्यापक होईल आणि त्याचे परिणाम कुठे कुठे होतील हे पाहावं लागेल, असे मोहन भागवत म्हणाले.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर

RSS Chief Mohan Bhagwat Speech: आज देशभरात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. नागपुरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यलयामध्येही दसऱ्यानिमित्त विजयादशमी महोत्सव पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह नागपूर महानगर संघचालक राजेश लोहिया, विदर्भ प्रांत संघचालक दीपक ताममशेट्टीवार, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधसकृष्णन हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

काय म्हणाले मोहन भागवत?

विज्ञान अनेक सुविधा घेऊन आला आहे, इस्त्राईल सोबत हमास युद्ध किती व्यापक होईल आणि त्याचे परिणाम लुठे कुठे पडेल हे पाहावे लागतील. तंत्रज्ञान आणि शिक्षा क्षेत्राबद्दल बोलले आहे. पर्यावरण सुष्ट्री आज सर्वांनी स्वीकारले आहे, भारताला पुढे नेण्याचे काम वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या माध्यमातून होत आहे, युवकांमध्ये स्व गौरव वाढत आहे, हे चालत राहील. भारतीय समाजाने बदल करत समाजाला पुढे नेत राहावे,देश आगेकूच करेल हा विश्वास आहे.

भारताला धोका..

देश पुढे जाईल त्यावर आज कमी बोलणार नाही. पण देशापुढे काही आव्हानेही आहेत. त्यामुळे आज त्याची चर्चा करण्याची गरज आहे. भारत पुढे जाऊ नये असे काहींना वाटते. त्यासाठी अनेक अडथळे आणतील. आज पण आपण शत्रूंना मदत करत आहोत, असा स्वभाव इतरांकडे नाही. काही जणांकडून भारत पुढे जाऊन स्पर्धक होऊ नये म्हणून उत्पाद केले जात आहेत. इस्त्राईलसोबत हमास युद्ध किती व्यापक होईल आणि त्याचे परिणाम कुठे कुठे होतील हे पाहावं लागेल, असे मोहन भागवत म्हणाले.

"आज पहिल्यांदा हिंदू रस्त्यावर आल्याने बचाव होऊ शकला. कट्टरपंती प्रवृत्ती जिवंत आहे तिथे हिंदूंवर संकट राहणार आहे. हिंदू समाजाच्या हे लक्षात आले पाहिजे. संघटीत आणि एकत्र राहा पण हिंसक होऊ नका असा संदेश दिला. देशात सर्वत्र केरळ तामिळनाडू पूर्वांचाल आज अस्वस्थ आहे, कारण प्रदेशात ही परिस्थिती उद्भवली आहे. कट्टरपंथाला उकसवून उत्पाद केले जात आहेत. सामाजिक समरसता आणि सद्भावना याशिवाय समाज येऊ शकत नाही, असा संदेशही त्यांनी दिला.

व्यक्तिगत आणि पारिवारिक स्तरावर मित्रता असली पाहिजे, माझा मित्र कुटुंब पंथ संप्रदायाचे वेगळे असले तरी मित्रता समाज समरसता आणते. कोणाचा अपमान होऊ नये याच भान ठेवला पाहिजे, संयमी व्यवहार करायला शिका. दुनिया की रीत आहे शक्तीला स्वीकारते, भारत वर्ष शक्ती वाढल्यानं मान वाढला, नागरिकांची प्रतिष्ठा वाढली. शक्ती संपन्न झाल्या शिवाय भारताला कोणी स्वीकारणार नाही, असे प्रतिपादनही यावेळी मोहन भागवत यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT