Man Ends Life After Blackmail by Girlfriend Saam
महाराष्ट्र

लग्नानंतर दुसरीवर जीव जडला, गर्लफ्रेंडकडून छळ, पंतप्रधानांना पत्र लिहून तरूणानं आयुष्य संपवलं

Man Ends Life After Blackmail by Girlfriend: नागपुरात विवाहित तरूणानं प्रेयसीच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

  • प्रेयसीच्या छळाला कंटाळून विवाहित तरूणानं आयुष्य संपवलं.

  • मृत्यूपूर्वी पंतप्रधान अन् कृषिमंत्र्यांना पत्र लिहिलं.

  • पत्नीकडूनही गर्लफ्रेंडवर आरोप.

नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका विवाहित पुरूषाने प्रेयसीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्र्यांना पत्र लिहिलं. यात तरूणानं न्यायाची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी तरूणाच्या प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ईश्वरलाल कंवरलाल चौधरी (वय वर्ष २९) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो मुळचा राजस्थान येथील रहिवासी होता. तर, गुंजन असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरूणीचे नाव आहे. ईश्वरलाल या तरूणाचे याआधीही लग्न झाले होते. तो शिक्षणानिमित्त नागपूरच्या काचीपुरा चौकातील मुलांच्या वसतिगृहात राहत होता.

ईश्वरलालचे नागपूरमध्ये प्रेमसंबंध जुळले होते. त्यांचे रिलेशनशिप सुरू होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून गुंजन ईश्वरलाल पैशांसाठी ब्लॅकमेल करीत होती. तसेच लग्नासाठी दबाव टाकत होती. याच कारणामुळे गेली काही दिवस गुंजन तणावात राहत होता. याच तणावातून त्यानं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

१ ऑक्टोबरला त्यानं राहत्या खोलीत गळफास घेऊन आयुष्य संपवलं. हे प्रकरण समोर येताच बजाजनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ईश्वरच्या पत्नीचाही जबाब नोंदवला. 'गुंजन वारंवार ईश्वरकडे पैशांची मागणी करत होती. तसेच लग्नासाठी दबाव टाकत होती. तिच्या मानसिक छळाला कंटाळून पतीनं मृत्यूला कवटाळलं'. याप्रकरणी पोलिसांनी गुंजनविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ईश्वरने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत त्यांनी पंतप्रधान आणि कृषीमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली. 'भारतामध्ये सर्वांसाठी कायदा सारखाच असावा. मुली काही महिलांकडून कायद्याचा गैरफायदा घेतला जात आहे. माझ्यासोबत ज्यांनी चुकीचं केलंय, त्यांना शिक्षा झाली पाहिज. माझा व्यायालयावर पूर्ण विश्वास आहे', असे पत्र पंतप्रधान आणि कृषिमंत्र्यांना लिहून कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

SCROLL FOR NEXT