Nagpur News Hingna Police Found Married women body near Samruddhi Mahamarg Saam TV
महाराष्ट्र

Crime News: समृद्धी महामार्गाजवळ आढळला विवाहितेचा मृतदेह; अत्याचार करून हत्या केल्याचा पोलिसांना संशय

Samruddhi Mahamarg Crime News: समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेतात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

Satish Daud

Samruddhi Mahamarg Crime News

समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेतात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरू केला आहे. मृत महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. मात्र, या महिलेचं वय ३० ते ३५ वर्ष असावं, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गालगत (Samruddhi Mahamarg) असलेल्या गुमगाव-वडगाव मार्गावरून मंगळवारी काही शेतमजूर शेतात जात होते. या मजूरांना एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला. मृत महिलेच्या अंगावर कपडे नव्हते.

तसेच तिच्या कपाळावर कुंकू लावण्यात आले होते. या महिलेचा गळा देखील चिरलेला होता. हे भयंकर दृष्य पाहताच शेतमजूर धास्तावले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांना (Police) महिलेच्या मृतदेहाजवळ काही वापरलेली कंडोमची पाकिटे, सोन्याचे कानातले, अंगठी, ब्लेड आणि पूजेचे साहित्य सापडले. यासोबत घटनास्थळी पोलिसांना फिकट रंगाचे जॅकेटही सापडले.

नवीन महिलेच्या चप्पलचा एक भाग झुडपांमध्ये सापडला. ती महिला, बहुधा तिच्‍या वयाच्या ३० च्या दशकातील असल्‍याची आणि तिने विवाहित असल्‍याचे मानले जात असल्‍याने तिने फिकट रंगाचे जाकीट घातले होते.

प्राथामिक तपासानंतर मृत महिला विवाहित असून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत महिला मध्यम वर्गीय कुटुंबातील असून अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.

आरोपींनी या महिलेवर अज्ञात स्थळी बलात्कार केला असावा, तसेच तिचा मृतदेह समृद्धी महामार्गालगत फेकला असावा, अशी चर्चा देखील परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. याप्रकरणी हिंगणा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दारूच्या नशेत नवऱ्याचं भयंकर कृत्य, भरदिवसा बायकोवर कोयत्याने वार, दोन्ही हात कापले नंतर...

Siddharth Jadhav: चेहऱ्यावर क्रौर्य, नजरेत दरारा; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मध्ये सिद्धार्थ जाधवचा काळजात धडकी भरवणारा लूक

Sai Tamhankar Photos: सईला पाहून वातावरण तापलं, लेटेस्ट फोटो एकदा पाहाच

Maharashtra Live News Update: आदिवासी भगिनींकडून मंत्री भरत गोगावले यांना भाऊबीजेची ओवाळणी

Kalyan Crime News : ५० रुपये द्यायला नकार दिला, भरदिवसा नशेखोर तरुणाकडून दुकानदारावर चाकूहल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT