Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Rain Alert : पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा

Nagpur Rain News : बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा प्रभाव पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस असणार आहे. यामुळे या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : राज्यात गायब झालेला पाऊस आता हळूहळू सक्रिय होऊ लागला आहे. विदर्भात देखील पावसाने हजेरी लागली असून पुढील दोन दिवसात पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यात रेड अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज व येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवसांनी मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे.

राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून अधून मधून पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे. काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा प्रभाव पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस असणार आहे. यामुळे या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

चार जिल्ह्यांना रेड अलर्ट 

नागपूरसह अनेक भागात कालपासून पावसाला सुरवात झाली आहे. मात्र पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात २५ जुलैला चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यात ऑरेंज आणि ऍलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. 

२७ जुलैनंतर पावसाचा जोर होणार कमी 

त्याच प्रमाणे २६ जुलैला देखील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यात मात्र ऍलो अलर्ट राहणार आहे. या दोन दिवसात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असणार आहे. यानंतर म्हणजे २७ जुलैनंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT