मैदानावर क्रिकेट खेळताना मुलाचा मृत्यू.
बॅटिंग करताना १३ वर्षीय मुलगा खाली कोसळला.
रूग्णालयात पोहोचण्यापूर्वी प्राण सोडले.
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथून ह्रदयद्रावक बातमी समोर येत आहे. एका १३ वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रणव मैदानावर क्रिकेट खेळत होता. त्याचवेळी त्याच्या पोटात बॅट लागली. त्यानंतर मुलगा खाली कोसळला. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोंडस मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर दुखा: चा डोंगर कोसळला आहे.
प्रणव आगलावे (वय वर्ष १३) असे मृत मुलाचे नाव आहे. तो भिवापूर परिसरातील रहिवासी होता. ही धक्कादायक घटना बुधवारी घडली. बुधवारी सायंकाळी प्रणव मैदानावर क्रिकेट खेळायला गेला होता. तो मित्रांसोबत खेळत होता. यानंतर त्याला बॅटिंग देण्यात आलं. बॅटिंग दिल्यानंतर बॅट त्याच्या पोटात जोरात लागली. बॉलला मारत असताना बॅट पोटात लागली.
यानंतर प्रणव वेदनेनं विव्हळत होता. तो जमिनीवर कोसळला. मित्रांनी त्याला प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनी तातडीने आजूबाजूच्या लोकांना आवाज देऊन मदतीसाठी बोलावून घेतलं. प्रणवला तातडीने रूग्णालयात दाखल केलं. मात्र, रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी तपासून प्रणवला मृत घोषित केले. कुटुंबाला कळताच त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. प्रणवला मृत अवस्थेत पाहून कुटुंबाला धक्का बसला. प्रणवच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.