Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Fraud : मंत्रालयात मुलाखत घेत दिले बोगस नियुक्तीपत्र; पती- पत्नीचा कारनामा उघड, पोलिसात गुन्हा दाखल

Nagpur News : २०२० ते २०२२ या कालावधीत सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सुरू असलेल्या फसवणुकीच्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. मंत्री कोट्या अंतर्गत नोकरी लावून देण्याची बतावणी

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने नागपुरातील पती- पत्नी आणि अन्य दोघांकडून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात बेरोजगारांना गाठत त्यांना सरकारी नोकरीसाठी मंत्रालयात मुलाखत घेतली. इतकेच नाही तर बोगस नियुक्ती पत्र देखील दिले. या प्रकरणात नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

नागपूरच्या मानेवाडा रिंग रोड येथे राहणारा लॉरेन्स मारीदास हेनरी आणि त्याची पत्नी शिल्पा हेनरी, विजय पाटणकर आणि नितीन साठे अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. या सर्वांविरोधात सुरेश धमगाये यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान २०२० ते २०२२ या कालावधीत सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सुरू असलेल्या फसवणुकीच्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे.

सरकारी नोकरीसाठी १२ लाखाची मागणी 

या प्रकरणात लॉरेन्सने तो नेक्सस एचआर सोल्युशन्स ही जॉब प्लेसमेंट एजन्सी चालवत असल्याचे तसेच मंत्री कोट्या अंतर्गत नोकरी लावून देण्याची बतावणी त्याने केली. तसेच सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तक्रारदार सुरेश धमगाये यांच्याकडून १२ लाखांची मागणी केली. त्यांच्यावर विश्वास ठेवत धमगाये यांनी ६ लाख ८९ हजार रुपये लॉरेन्स यास दिले.  विशेष म्हणजे मंत्रालयात मुलाखत असल्याचे सांगत धमगये यांना मुंबईत बोलविले.

मंत्रालयात मुलाखतीचे नाटक 
मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर नेत तेथील रेकॉर्ड रूममध्ये साठे नावाच्या तथाकथित अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली. यात साठेने मुलाखत घेण्याचे नाटक केले. यानंतर बनावट नियुक्ती पात्र दिले. मात्र बराच कालावधी उलटून देखील आरोपींनी कुठलीही नोकरी लावून दिली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे धमगाये यांच्या लक्षात आले. पैसे परत मागितल्यावर केवळ दोन लाख परत केले. उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर धमगाये यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात चारही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT