theft saam tv
महाराष्ट्र

भरदिवसाचा थरार; युवतीला बंदुकीचा धाक दाखवत दरोडा

भरदिवसाचा थरार; युवतीला बंदुकीचा धाक दाखवत दरोडा

मंगेश मोहिते

नागपुर : नागपुरात भरदिवसा युवतीला बंदुकीचा धाक दाखवत फ्लॅटमध्ये दरोडा टाकल्याची घटना समोर आली. यात दोन आरोपींनी अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. नागपूरचा (Nagpur) गजबजलेला परिसर म्हणून ओळख असलेल्या बजाजनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे चांगलीच खडबड माजली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. (nagpur news crime news young woman being robbed at gunpoint)

नागपुरातील बजाजनगर पोलीस (Nagpur Police) स्टेशन हद्दीतील उज्वला अपार्टमेंटमध्ये भर दुपारी फ्लॅटला कुलूप लागलेले असल्याचे बघून दोन आरोपींनी कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. मात्र फ्लॅटमध्ये २३ वर्षीय युवती असल्याचे त्यांना दिसून आल्याने आरोपीने तिच्यावर बंदूक ताणली आणि घरातील कपाटाच्‍या चाब्या घेत सोन्याचे दागिने आणि नगदी रक्कम असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार (Theft) झाले. पोलिसांनी आता आरोपीचा स्केच बनवून त्यांचा शोध सुरू केला.

युवती करत होती आराम

युवती घरात आराम करत होती आईला बाहेर जायचे असल्याने त्यांनी बाहेरून कुलूप लावले होते. आरोपीने घरात कोणी नाही याचा फायदा घेत प्रवेश केला. मात्र घरात युवती असल्याने त्यांचा गोंधळ उडाला आणि चक्क तिच्यावर बंदूक ताणत चोरी करून फरार झाले. मात्र भरदिवसा झालेल्या या दरोड्याचा घटनेने परिसरात खडबड माजली सोबतच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT