महिलांनी केले दारू विक्रेत्याला जेरबंद; पोलिसांविरोधात रास्ता रोको

महिलांनी केले दारू विक्रेत्याला जेरबंद; पोलिसांविरोधात रास्ता रोको
महिलांनी केले दारू विक्रेत्याला जेरबंद; पोलिसांविरोधात रास्ता रोको
Published On

हिंगोली : जिल्ह्यातील पोत्रा गावात महिला रणरागिणींनी दारू विक्रेत्याला मुद्देमालासह जेरबंद केले. पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त करत पकडलेल्या दारूचे रस्त्यावरच प्रदर्शन भरवले. (hingoli news women arrested for selling liquor Block the road against the police)

हिंगोलीत महिलांनी अवैध व्यवसाय करणाऱ्या माफियांना मुद्देमालासह जेरबंद केले आहे, हिंगोलीच्या कळमुरी तालुक्यातील बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पोत्रा गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध देशी दारु विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. या विरोधात वारंवार तक्रारी देऊन देखील पोलीस दखल घेत नसल्याने, आज या गावातील महिलांनी एकत्र येत मोठे धाडस दाखवत सापळा रचून दारूचे बॉक्स पकडले आहे.

पोलिसांचे अभय म्हणून..

दारू विक्रेत्यांना बाळापूर पोलिसांचे अभय असल्याचा आरोप करत या महिलांनी देशी दारूच्या बाटल्यांचे रस्त्यावर प्रदर्शन मांडत पोलिसांच्या विरोधात तासभर रास्ता रोको केला. दरम्यान आंदोलन करणाऱ्या महिलांचा संताप पाहून बाळापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत कार्यवाही सुरू केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com