Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur: अल्‍पवयीन मुलांच्‍या टोळीची सात ठिकाणी घरफोडी; पोलिसानी घेतले ताब्‍यात

अल्‍पवयीन मुलांच्‍या टोळीची सात ठिकाणी घरफोडी; पोलिसानी घेतले ताब्‍यात

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी घरफोडी करणारी अशी (Nagpur) एक टोळी पकडली. ज्यामध्ये सहा पैकी चार सदस्य हे विधी संघर्ष बालक म्हणजेच अल्पवयीन आहेत. यांनी सात ठिकाणी घरफोडी (Crime News) केल्याचे उघड झाले असून यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने सुद्धा हस्तगत करण्यात आलेत. (Breaking Marathi News)

दिवाळीच्या (Diwali) काळात हुडकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या घटनांवर लक्ष केंद्रित केले होते. यातील एका टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत. या टोळीमध्ये सहा सदस्य असून त्या सहापैकी चार हे अल्पवयीन आहेत. या टोळीने सात घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

बंद घराची करायचे ते पाहणी

पोलिसांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह मुद्देमाल सुद्धा हस्तगत केला. या टोळीचा नेमका मोरक्या कोण आणि एवढे लहान मुलं एवढ्या गंभीर गुन्ह्यात कसे काय सामील झाले? याचा शोध आता पोलीस घेत आहे. पोलिसांनी या टोळीला पकडल्यानंतर आणि याची विचारपूस केल्यानंतर अनेक गंभीर बाबी समोर आल्या. लहान पोरांच्या माध्यमातून बंद असलेल्या घराची पाहणी करत हे रात्रीच्या वेळी तिथे जाऊन चोरी करायचे. मुद्देमाल आपसात वाटून घ्यायचे. पण आता यांचा सगळा प्रकार समोर आला असून आता यांना जेलची हवा खावी लागणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation : मी लग्नासाठी तयार, आता लक्ष्मण हाके यांनी मुलगी द्यावी; मुंडावळ्या बांधलेल्या रमेश पाटलांचा व्हिडिओ व्हायरल

Pakistan Protest: जेन झी मैदानात पाकिस्तानात सत्तापालट? नेपाळनंतर पाकमध्येही तरुणाई आक्रमक

Banjara Reservation: बीड जालन्यातून बंजारा समाजाचा हुंकार, हैदराबाद गॅझेटियरमुळे सरकारची कोंडी

Chandrapur: शासकीय इमारतीत रंगली दारू पार्टी, जिल्हा परिषद अभियंत्यांचा प्रताप; पाहा VIDEO

Vomiting In Bus: बसमधून प्रवास करताना उलट्या का होतात?

SCROLL FOR NEXT