Sharad Ponkshe: सत्ता गेल्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी फालतूगिरी; अभिनेते शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीवर आरोप

सत्ता गेल्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी फालतू गिरी; अभिनेते शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीवर आरोप
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe Saam tv
Published On

पंढरपूर : पुरोगाम्यांना हिंदू राष्ट्र म्हणणं आवडत नाही. हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र नको आहे याचा त्यांना‌ त्रास होतो. राज्यातील सत्ता गेल्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही फालतू गिरी सुरू असल्याचा गंभीर आरोप अभिनेते शरद पोंक्षे यांनी (NCP) राष्ट्रवादीवर केला आहे. (Letest Marathi News)

Sharad Ponkshe
Abdul Sattar : अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत; औरंगाबाद खंडपीठाने दिले चौकशीचे आदेश, काय आहे प्रकरण?

हरहर महादेव या मराठी चित्रपटावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. यामध्ये आता चित्रपट अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी उडी घेतली आहे. शरद पोंक्षे हे रात्री एका पुरस्कार कार्यक्रमासाठी पंढरपुरात (Pandharpur) आले होते. यावेळी त्यांनी हरहर महादेव चित्रपटाला होत असलेल्या विरोधा नंतर प्रतिक्रिया दिली.

तुम्‍ही गुंड आहात का?

सेनसॉर संमत असलेला चालू सिनेमा बंद पाडता. प्रेक्षकांना मारहाण करता. तुम्ही गुंड आहात का? स्वतःला पुरोगामी समजता का? शाहु, फुले, आंबेडकरांनी हेच शिकवले का असे अनेक सवाल उपस्थित करत अप्रत्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीला टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com