Youth drowns in Salai Mendha lake while swimming with friends  saam tv
महाराष्ट्र

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह झाला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Nagpur 20-Year-Old Youth Drowns in Lake : नागपूरमधील कामठी येथील एका २० वर्षीय मुलाचा तलावात पोहताना बुडून मृत्यू झालाय. २० वर्षीय तरुण आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला होता.

Bharat Jadhav

  • ही दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील सालईमेंढा येथे घडली.

  • २० वर्षीय पियुष सुखदेवे आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला होता.

  • पोहण्याचा मोह झाल्यामुळे पाण्यात शिरल्यावर पियुषचा बुडून मृत्यू झाला.

  • या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

तलावातील पाणी पाहून पोहण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतलाय. पोहोण्याच्या मोहापायी एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ही घटना नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा येथे घडलीय. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पियुष सुरज सुखदेवे असं मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. पियुष हा नागपूर जिल्ह्यातील कामठीत येथील रहिवाशी होता. पियुष आपल्या पाच मित्रांसोबत हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा तलावकाठी फिरायला गेला होता.

मृणाल विमेश उर्क वय २०, हर्ष सिद्धार्थ थुलकर (१९) , करणं लक्ष्मण चौधरी(१८), क्रिश प्रकाश स्वामी आणि पियुष सुखदेवे हे पाचही मित्र सालईमेंढा तलावकाठी फिरायला गेले होते. तलावातील पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आला. तलावात पोहण्याचा आनंद घ्यावा असं त्यांना वाटलं आणि ते तलावात उतरले. पियुष हा खोल पाण्याचा प्रयत्न करू लागला.

पण त्याला तलावातील पाण्याचा अंदाज आला नाही. तो पाण्यात बुडू लागला. पियुषसोबत अजून एक मित्र होता त्यालाही पोहता येत नव्हतं. इतर बाकी मित्रांना त्याला पकडून तलावाच्या बाहेर काढलं. पण पियुषला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. बाकी तीनजणांना बाहेर काढण्यात यश आले. पियुषला पाण्यातून बाहेर काढता न आल्यानं त्याचा पाण्यात बूडून मृत्यू झाला.

पियुषसोबत असलेल्या इतर मित्रांनी पोलिसांना घाबरत घाबरत घडलेल्या घटनेची माहिती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. पियुष खोल पाण्यात बुडल्याने त्याचा मृतदेह दिसत नव्हता. त्यामुळे पाच गोताखोरांना आणि अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले. गोताखोरांनी अग्निशमक दलाच्या बोटीच्या साहाय्याने पियुषचा शोध घेऊ लागले. काही वेळ शोध घेतल्यानंतर पियुषचा मृतदेह मिळाला.

सुमारे चार ते पाच तासानंतर त्याचा मृतदेह शोधण्यात अग्निशमक दलाला यश आले. मृणाल विमेश उके (२०),हर्ष सिद्धार्थ थुलकर (१९),दोघेही रा. कपिलनगर, नागपूर ,करणं लक्ष्मण चौधरी(१८) बाराखोली, जरीपटका आणि क्रिश प्रकाश स्वामी (१९)....मोतीबाग रेल्वे क्वार्टर, अशी यात थोडक्यात बचावलेल्या तरुणांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT