nagpur news  saam tv
महाराष्ट्र

Nagpur : पेपर संपल्यानंतर मित्रांसोबत पोहायला गेला आणि घात झाला; नागपुरातील धक्कादायक घटना

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

नागपूर : नागपुरातून (Nagpur) हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना आज दुपारी ३ ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. (19 years old Student drowns in Ambazari lake in Nagpur )

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचा अंबाझरी (Ambazari) तलावात बुडून मृत्यू झाला आहे. कुणाल राजकुमार बर्वे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. सदर विद्यार्थी आर.एस.मुंडले या वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल आज दुपारी पेपर संपल्यानंतर आपल्या मित्रांसह अंबाझरी तलावाजळव फिरायला गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत मित्र देखील होते. तलावाजवळ पोहोचल्यानंतर त्याचे मित्र पोहण्यासाठी उतरले.

मित्र पोहायला तलावात उतरल्यानंतर कुणालला देखील मोह झाला. त्यामुळे तोही तलावात पोहण्यासाठी गेला. कुणाल तलावात उतरताच पाण्यात बुडायला लागला. मात्र, कुणाल बुडताना त्याच्या मित्रांना तो नाटक करत असल्याचे वाटले. पण काही वेळानंतर तो दिसेनासा झाला. हा सगळा प्रकार स्टंट करताना घडला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये आज एका विद्यार्थ्यांला जिवाला मुकावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये कमी मतदार नोंदणीसाठी पक्षातील काही नेते जबाबदार, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Ind vs NZ : भारताच्या वनडे संघात पुन्हा बदल; ताज्या दमाच्या तेजतर्रार गोलंदाजाची एन्ट्री, बाहेर कोण अन् कसा असेल संघ?

Gold Rate Today: दिवाळीच्या तोंडावर मोठा धमाका! सोनं-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर

Relationship Tips: प्रेमात आहात, तुमचा पार्टनर रिलेशनशिपबाबत सीरियस की टाईमपास करतोय? 7 सिक्रेट अन् मिळेल खरं उत्तर

Election: विधानसभेसाठी आपची ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात?

SCROLL FOR NEXT