Hingoli : महाराष्ट्रातील भाविकांच्या वाहनाला कर्नाटकमध्ये अपघात; तिघे जागीच ठार, सहा जखमी

जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील भाविकांच्या वाहनाचा बेंगळुरु हायवेवर चित्रदुर्ग जवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे.
hingoli accident news
hingoli accident news saam tv
Published On: 

हिंगोली : जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील भाविकांच्या वाहनाचा बेंगळुरु (Bangalore)हायवेवर चित्रदुर्ग जवळ अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना चित्रदुर्ग येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Hingoli accident news )

hingoli accident news
जबलपूरमधील रुग्णालयाला भीषण आग; ८ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे राहणारे वानखेडे व लोमटे कुटुंबीय असे नऊ जण वाहनाने बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. या दोन्ही कुटुंबाचे दर्शन झाल्यावर ते दोन्ही कुटुंब तेथून निघाले. मात्र, चित्रदुर्ग जवळ त्यांचे वाहन रस्त्याच्या खाली जाऊन उलटले. या भीषण अपघातात वाहनातील राजेश वानखेडे, शंकर लोमटे, रेखा लोमटे हे तिघे जण जागीच ठार झाले आहेत.

या अपघतात गजानन वानखेडे, सावित्री वानखेडे, लक्ष्मण वानखेडे, अर्जून वानखेडे, कृष्णा बागल व गजानन वानखेडे यांची पत्नी असे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी चित्रदुर्ग येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात तीन जण ठार झाल्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

hingoli accident news
धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये पिकअप व्हॅनला विजेचा धक्का लागून 10 ठार, अनेक जखमी

दरम्यान, सदर अपघाताची माहिती वानखेडे कुटुंबातील बंडू वानखेडे यांनी आज पहाटे चित्रदुर्ग येथे पोहोचल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. अपघातातील तीनही मृतांवर उत्तरीय तपासणी करून त्यांचे मृतदेह आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास डोंगरकडा येथे रवाना करण्यात आले आहेत. तसेच या अपघातातील जखमी व्यक्तींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांनाही वाहनाने परत आणले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने डोंगरकडामधील गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.