howrah ahmedabad express  Saam tv
महाराष्ट्र

Nagpur news : हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसवर दगडफेक? खिडकीच्या काचा फुटल्या, रेल्वेकडून शोध सुरु, VIDEO

howrah ahmedabad express News : हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे. या दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटल्या आहेत.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपुरातून मोठी बातमी हाती आली आहे. नागपूरमध्ये हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या खिडकीच्या काचा फुटल्याची घटना घडली आहे. रेल्वे सुरक्षा बलाने ही दगडफेक नसल्याचा दावा केला आहे. तर प्रवाशांनी दगडफेक झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली आहे.

नागपुरात हावडा अहमदाबाद एक्स्प्रेसवर अचानक काचेवर दगड आल्याने खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या बी २ कोचच्या काचा फुटल्या. या कोचमधील प्रवाशांनी दगडफेक झाल्याचा आरोप केला आहे. यावर दगडफेक झाली की, रेल्वे ट्रॅकवरचे दगड उडाले? या संदर्भात आणखी शोध सुरू असल्याचं रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक विजय भालेकर यांनी घटनास्थळी धाव घेतले. त्यानंतर तिथे कोणीही आढळले नाही. त्यानंतर त्यांनी रेल्वे ट्रॅकवरील दगड उडाले असल्याचा दावा केला. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी विजय भालेकर यांनी दिली आहे .

दरम्यान, नागपुरातील इतवारी, कामठी, कन्हान परिसरात अनेकदा रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. नागपूरच्या बिलासपूर वंदेभारत एक्स्प्रेसवर देखील दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. हावडा अहमदाबाद एक्स्प्रेसच्या खिडकीच्या आज काचा फुटल्या आहेत. मात्र, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. या घटनेनंतर कामठी रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. या घटनेनंतर रेल्वे पोलीस देखील चौकशीसाठी पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT