Dhanshri Shintre
भारतीय रेल्वे ही मोठी संस्था असून, तिच्या वाणिज्य विभागांतर्गत TTE पदासाठी भरती केली जाते आणि नियुक्ती होते.
रेल्वे प्रवासात आपण TTE आणि TC या तिकीट तपासणी अधिकाऱ्यांना पाहिले असेल, पण त्यांच्यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?
TTE म्हणजे ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर. त्याचे प्रमुख काम म्हणजे ट्रेनमधील प्रवाशांची तिकिटं तपासणे आणि योग्य प्रवासी ओळख सुनिश्चित करणे.
टीटीईचं आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडणं आणि त्यांच्याकडून नियमानुसार दंड वसूल करणं.
ट्रेनमध्ये उपलब्ध रिक्त जागांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार टीटीईकडे असतो आणि त्या जागा ते इतर पात्र प्रवाशांना वाटू शकतात.
टीसी म्हणजे तिकीट कलेक्टर. टीटीईप्रमाणे तो ट्रेनमध्ये जाऊन तिकिटांची तपासणी करत नाही, तर प्लॅटफॉर्मवरच त्याचे कामकाज मर्यादित असते.
टीसीचं प्रमुख कार्य स्टेशनवरच सीमित असतं. ते प्लॅटफॉर्मवर किंवा गेटवर तिकीट तपासतात आणि विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करतात.