Dhanshri Shintre
हिंदू संस्कृतीत गंगा नदीला अत्यंत शुभ व पवित्र मानले जाते आणि ती देवीच्या रूपात पूजली जाते.
गंगा नदीचे पाणी अत्यंत शुद्ध मानले जाते, कारण गंगेला हिंदू धर्मात देवी म्हणून पूजले जाते.
पण तुम्हाला माहित आहे का, मुघल सम्राट अकबरलाही गंगाजलावर विश्वास होता आणि तो ते पित असे.
इस्लाम धर्म मानणारा सम्राट अकबर गंगाजलाच्या शुद्धतेवर विश्वास ठेवत असे आणि नियमितपणे ते पिण्याची सवय होती.
आईन-ए-अकबरीच्या उल्लेखानुसार, मुघल सम्राट अकबर नियमितपणे गंगानदीचे पाणी पिण्यास प्राधान्य देत असे.
अकबर जेव्हा लष्करी मोहिमांवर जात असे, तेव्हा तो नेहमीच आपल्या सोबत गंगाजल नेऊन ठेवत असे.
असं सांगितलं जातं की जेव्हा अकबर लाहोरमध्ये होता, तेव्हा गंगाजल तिथपर्यंत खास पोहोचवले जात असे