समृद्धी महामार्गावर खिळे ठोकल्याचा आरोप चर्चेत.
अपघाताच्या भीतीमुळे लोकांमध्ये संभ्रम.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं दिलं स्पष्टीकरण.
नागपूर-मुंबईमधील अंतर, सुपरफास्ट प्रवास नंतर अपघातामुळे चर्चेत राहणारा समृद्धी महामार्ग पुन्हा लोकांच्या चर्चेत आलाय. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणार हा महामार्ग आता खिळ्यांमुळे चर्चेत आलाय. तुम्ही म्हणाल खिळे आणि महामार्गाचा काय संबंध? अन् त्यामुळे राज्यातील महत्त्वकांक्षी महामार्ग चर्चेत आलाच कसा? पण वाचकांनो, त्याचं असं की, या महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याच समोर आले आहे. त्याच खिळ्यांमुळे समुद्धी महामार्ग चर्चेत आलाय. दरम्यान याप्रकरणी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्टीकरण दिलंय. (Why Are Nails on Samruddhi Expressway? MSRDC Responds to Viral Reports)
महामार्गावर खीळे नव्हे तर, रस्त्यावरील सूक्ष्म तडे भरताना वापरण्यात आलेले ‘अॅल्युमिनिअम नोजल्स' आहेत. समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. समृद्धी महामार्गावर १०० पेक्षा जास्त खिळे ठोकण्यात आलेत. याचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या खिळ्यांमुळे जवळपास ३ ते ४ वाहनांचे टायर पंक्चर झालेत. हे खिळे पाहून हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न वाहनचालकांना पडलाय.
सोशल मीडिया इन्फ्यूअन्सर डॉ. शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. दरम्यान यानंतर MSRDC स्पष्टीकरण दिलंय. समृद्धी महामार्गावर मुंबई दिशेकडील पहिल्या आणि दुसऱ्या लेनमध्ये साधारण १५ मीटर लांबीचे सूक्ष्म तडे आढळले होते. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाअंतर्गत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘इपॉक्सी ग्राउटिंग'द्वारे हे तडे भरण्याचे काम सुरू होतं. हे काम करताना ‘अॅल्युमिनिअम नोजल्स' लावावे लागतात.
हे काम ९ सप्टेंबरच्या रात्री ११.३० वाजता पूर्ण झाले. काम सुरू असताना वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वेगाने आलेल्या काही गाड्यांनी ‘डायव्हर्जन' ओलांडलं आणि त्या ‘नोजल्स'वरून गेल्या. त्यामुळे ३ गाड्यांचे टायर पंक्चर झाले. ही घटना आज १० सप्टेंबरच्या रात्री १२.१० च्या सुमारास घडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.